Disha Patani Boyfriend Rumours: टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा करतेय 'या' सुपरस्टारला डेट? टॅटूमुळे चर्चांना उधाण

Disha Patani's Dating Rumours: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर दिशाच्या नवीन टॅटूच्या चर्चा होत आहे. या टॅटूमुळे दिशा सुपरस्टारला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत.
Disha Patani's Tattoo: टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा करतेय 'या' सुपरस्टारला डेट? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Disha PataniSaam Tv

ऋतुजा कदम; साम टीव्ही

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह असल्याने तिचे अनेक चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर दिशा कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तर, तिचे एअरपोर्ट लूकही कायमच व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी ती चर्चेत आलीये एका वेगळ्याच कारणाने!

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे एका लॉंग टर्म रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांचा ब्रेअकप झाला अशाही बातम्या समोर आल्या. आता दिशाच्या अफेअरच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशाच्या आयुष्यात मॉडेल अलेक्झॅंडर अ‍ॅलेक्सची एन्ट्री झाल्याचं बोललं गेलं होतं.

गेल्या काही काळापासून दिशा या मॉडेलसोबत वारंवार दिसली. अलेक्झांडर ॲलेक्स इलिक आणि दिशाला एकत्र फिरताना पॅपराझींनी अनेकदा स्पॉट केलं होतं. विशेष म्हणजे, अलेक्झांडरने अलीकडेच त्याच्या हातावर दिशाच्या चेहऱ्याचा टॅटू काढला, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, आता दिशा आपल्यापेक्षा वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू आहे. तिने नुकताच आपल्या हातावर एक टॅटू काढलाय. आणि त्यामुळेच तिच्या नव्या अफेअरबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडीओमध्ये दिशाने निळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट घातल्याचं दिसते आहे. त्यासोबत तिने काळ्या रंगाचे सनग्लासेस आणि सोबतच पांढऱ्या रंगाची बॅगही कॅरी केली आहे. दिशाचा हा लूक अतीशय स्टायलीश असून नेटकऱ्यांच्या हा लूक पसंतीत उतरला आहे. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिशाने आपल्या एका हातावर ‘पीडी’ या अक्षरांचा टॅटू काढलाय असं दिसतंय. त्यामुळे दिशा आपल्या हातावरील टॅटूमुळे चर्चेत आली आहे. दिशा आपल्यापेक्षा वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू आहे. दिशा पटानीच्या हातावरील टॅटू समोर येताच चाहत्यांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली. या टॅटूतील P याचा अर्थ प्रभास असल्याची चर्चा आहे. मात्र, काहींनी तर दिशाने स्वत:च्या नावाचीच अक्षरे उलट म्हणजेच पटानी दिशा लिहिलंय असंही म्हटलंय.

Disha Patani's Tattoo: टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा करतेय 'या' सुपरस्टारला डेट? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Dharmaveer 2 : CM एकनाथ शिंदे 'धर्मवीर २' चित्रपटात झळकणार? चर्चांना उधाण

मात्र, प्रभास आणि दिशाचं नाव जोडलं जाण्यामागे कारण तरी काय? प्रभास आणि दिशाने नुकतेच 'कल्की 2898 एडी' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी दिशा आणि प्रभास यांचे सेटवरील आणि ऑफ स्क्रीन फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिशाने प्रभासच्या प्रेमिकाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे प्रभास आणि दिशाचे नाव जोडले जातंय अशी चर्चा आहे. खासकरुन सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच तिने हा टॅटू काढल्याने को-स्टार प्रभासशी काही संबंध आहे का? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. दिशा किंवा प्रभास दोघांकडून अद्याप याविषयी अधिकृतरित्या कोणतचं भाष्य केलेलं नाही.

दिशा आणि प्रभास यांची कल्की सिनेमामधून ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या सिनेमात कमल हसन, अमिताभ बच्चन, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा, दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. सध्या बॉक्सऑफिसवर हा सिनेमा आपली जादू करतोय. चित्रपटगृहात 'कल्की 2898 एडी' चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसत आहेत.

Disha Patani's Tattoo: टायगरसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा करतेय 'या' सुपरस्टारला डेट? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Tripti Dimri Film : 'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरीचं नशिबंच पालटलं; दिसणार आगामी ४ चित्रपटांत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com