Sonakshi-Zaheer Honeymoon: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल गेले हनिमूनला; रोमँटिक फोटो केले शेअर

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Honeymoon Photos: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी सध्या पती झहीर इक्बालसोबत फिरायला गेली आहे. तिने रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Photos: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल गेले हनिमूनला; रोमँटिक फोटो केले शेअर
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Honeymoon PhotosSaam TV

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेत आहे. सोनाक्षीने नुकतीच जहीर झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली. सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर प्रचंड उधाण आले आहे. सोनाक्षीने तिच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर आता सोनाक्षी आणि झहीर इक्बाल हनिमूनसाठी गेले आहेत.

सोनाक्षीने नुकतेच सोशल मीडियावर झहीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत.त्यामुळे हे दोघेही लग्नानंतर हनिमूनसाठी गेल्याच्या चर्चा होत आहेत.या फोटोत सोनाक्षी पती झहीरसोबत वेळ घालवताना दिसत आहे. या दोघांनी स्विमिंग पूलमधील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूपच क्युट दिसत आहे.

सोनाक्षीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती जोरजारात हसताना दिसत आहे. यावर झहीरने 'तिला मला ओरडायचे होते. परंतु त्याऐवजी मीच तिला हसवले. #HusbandHacks', असं लिहलं आहे.याचसोबत सोनाक्षीने एका रेस्टॉरंटमधील फोटोदेखील शेअर केले आहेत. सोनाक्षीने झहीर झहीर इक्बालसोबतचा मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंवर हे दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Photos: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल गेले हनिमूनला; रोमँटिक फोटो केले शेअर
Janhvi Killekar: जान्हवी किल्लेकरच्या घरातून मौल्यवान वस्तूंची चोरी; अभिनेत्रीने VIDEO शेअर करत दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. त्याचसोबत सिन्हा कुटुंबिय सोनाक्षीच्या लग्नामुळे नाराज असल्याचेही बोलले जात होते. मात्र, सोनाक्षीच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांनी हजेरी या चर्चा बंद झाल्या आहेत. सोनाक्षी आणि झहीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. परंतु आता हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Photos: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल गेले हनिमूनला; रोमँटिक फोटो केले शेअर
Dharmaveer 2 : CM एकनाथ शिंदे 'धर्मवीर २' चित्रपटात झळकणार? चर्चांना उधाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com