OTT Released This Week : जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका; 'मिर्झापूर ३', 'गरुडन' सह वेगवेगळ्या कलाकृती होणार रिलीज

OTT Released July 1st Week Films And Web Series : १ जुलै ते ७ जुलै या दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, ॲक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
OTT Released This Week : जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका; 'मिर्झापूर ३', 'गरुडन' सह वेगवेगळ्या कलाकृती होणार रिलीज
OTT Released July 1st Week Films And Web SeriesSaam Tv
Published on

दर आठवड्याला ओटीटीवर सिनेरसिकांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होत असतात. प्रत्येक आठवड्यामध्ये मराठी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट, वेबसीरीज आणि वेब शो रिलीज होत असतात. अशातच या ही आठवड्यातही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी असणार आहे.

Amazon Prime Video, Netflix, Zee 5, Disney Plus Hotstar, Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना अनेक दमदार चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. कॉमेडी, ॲक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १ जुलै ते ७ जुलै या दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'मिर्झापूर ३' सह इतर वेब सीरिज, चित्रपट रिलीज होणार आहे.

OTT Released This Week : जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका; 'मिर्झापूर ३', 'गरुडन' सह वेगवेगळ्या कलाकृती होणार रिलीज
Vishay Hard Trailer : प्रेम सॉफ्ट असलं तरी इथं 'विषय हार्ड' होणार; चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज
Mirzapur 3 Released 5th July
Mirzapur 3Instagram

मिर्झापूर ३ (Mirzapur 3)

बहुचर्चित 'मिर्झापूर' वेबसीरीजचाही तिसरा सीझन या आठवड्यामध्ये रिलीज होणार आहे. या सीरीजमध्ये गुड्डू भैय्या आणि कॉलिन भैय्यामधील वाद पाहायला मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून 'मिर्झापूर ३'बद्दलची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन येत्या ५ जुलैपासून 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर स्ट्रीम होणार आहे.

Prime Time With The Murthy's Web Show
Prime Time With The Murthy'sSaam Tv

प्राईम टाईम विथ मुर्थीज् (Prime Time With The Murthy's)

हा वेब शो प्रेक्षकांना 'जिओ सिनेमा'वर पाहायला मिळेल. फॅमिली ड्रामा असलेल्या ह्या वेब शोची जोरदार चर्चा होत आहे. येत्या ५ जुलैला हा शो रिलीज होणार आहे.

Garudan Film Released OTT
Garudan FilmSaam Tv

गरुडन

'गरुडन'हा टॉलिवूड चित्रपट असून थिएटर्सनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सूरी, एम. शशिकुमार आणि उन्नी मुकुंदन असून चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. दुराई सेंथिलकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या ३ जुलैला 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर स्ट्रीम होणार आहे.

Space Cadet Film Released OTT
Space Cadet FIlmSaam Tv

स्पेस कॅडेट

स्वत:च्याच जगात रमलेल्या एका मुलीची कथा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नासाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी हिची निवड होते. नासाच्या एका मोहिमेसाठी तिची निवड केली जाते. अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणादरम्यान काय घडते? तिच्या आयुष्यात काय बदल होतात? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com