Prasad Khandekar: प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ला थिएटर मिळेना, उपमुख्यमंत्र्यांनी दिलं कायदेशीर कारवाईचे आश्वासन

Prasad Khandekar Movie: प्रसाद खांडेकरचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तो एका संकटामध्ये आला आहे. या चित्रपटासाठी त्याला थिएटर मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. हाच मुद्दा आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला.
Devendra Fadnavis And Prasad Khandekar
Devendra Fadnavis And Prasad KhandekarSaam Tv

Ekda Yeun Tar Bagha Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी नव्या चित्रपटाची खास मेजवाणी घेऊन येणार आहे. प्रसाद खांडेकरांचा ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

पण प्रसाद खांडेकरचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तो एका संकटामध्ये आला आहे. या चित्रपटासाठी त्याला थिएटर मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. हाच मुद्दा आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार प्रविण दरेकर (MLA Pravin Darekar) यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रसाद खांडेकरांच्या चित्रपटाचा मुद्दा उचलून धरला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devedra Fadnavis) यांनी थिएटर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विधानपरिषदेमध्ये 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले की, 'मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बोरीवलीमध्ये राहणारा मराठमोळा अभिनेता प्रसाद खांडेकर हा हास्य जत्रेचा लोकप्रिय अभनेता आहे. ८ डिसेंबरला त्याचा 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा येत आहे. सिनेमातले काही बॉस आणि दादा लोकं या मराठी चित्रटाला थिएटर मिळवून देत नाहीयेत. प्रसाद खांडेकर हा मराठी तरूण आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहे. ला तात्काळ सिनेमागृह मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ही वनंती.'

प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, 'प्रसाद खांडेकर हे अतिशय गुणी कलावंत आहेत. हास्य जत्रेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांनी लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. जर अशा मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आणि थिएटर उपलब्ध करून दिले जाईल.' असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Devendra Fadnavis And Prasad Khandekar
Jagadeesh Prathap Bandari Arrested: 'पुष्पा द राइज' फेम अभिनेत्याला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

दरम्यान, प्रसाद खांडेकरच्या या चित्रपटाच्या माध्यमातून १६ विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’, या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासह १६ दमदार कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहे. दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis And Prasad Khandekar
Ram Mandir Opening: राम मंदिराच्या उद्घाटनाला ७ हजार पाहुण्यांना निमंत्रण, सचिन तेंडुलकरपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत हे सेलिब्रिटी लावणार हजेरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com