Mumbai News : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकाकडे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित महिलांना तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न होणार? जर ती पीडित महिला हे सगळं पाहत असेल तर त्यांनी सभागृहावर विश्वास ठेवायला हवा. तसेच वृत्तवाहिन्यांनी व्हिडिओ दाखवताना थोडी काळजी घ्यावी अशी विनंती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणारा आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं मुली आणि बाकीची कुटुंब असते. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना बंधन सर्व माध्यमांनी गंभीरतेने पाळावे.
सभागृहातील चर्चा संबंधीत महिला मध्यामामधून ऐकत असेल तर तिला याद्वारे आश्वस्थ करण्यात येते की तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा आपण सभागृहात बोलतो ते पीडीत महिला ऐकतात, असं डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडीओबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे.
तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं महिला आयोगाने ट्वीट करत माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.