Sushma Andhare on Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांचे व्हिडीओ भाजपनेच व्हायरल केले, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप; कारणही सांगितलं

Political News : देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं.
Sushma Andhare on Kirit Somaiya
Sushma Andhare on Kirit SomaiyaSaam TV
Published On

सचिन जाधव

PUNE News : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं आहे. या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं.

या प्रकरणावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा व्हिडीओ भाजपनेच व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे. पण भाजपने अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. (Latest Marathi News)

Sushma Andhare on Kirit Somaiya
Kirit Somaiya Case: किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणावरून विधानपरिषदेत गदारोळ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

या व्हिडीयोबाबत चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. महिलांची गोपनीयता ठेवली पाहिजे. मात्र हा व्हिडीओ देखील भाजपनेच व्हायरल केला आहे. अनेक अस्वच्छ लोक सोबत घेतल्यावर त्यांच्यावर आरोप करणारा माणूसच अस्वच्छ आहे, हे त्यांना दाखवायचं आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच कारवाई करतील का? असा प्रश्न आहे. याअगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली, पण त्यांनी काय केलं. किरीट सोमय्या यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचं आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com