दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून (south film industry) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 'पुष्पा द राइज' फेम (Pushpa Movie) अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादच्या पंजागुट्टा पोलिसांनी अभिनेता जगदीश प्रताप बंदरीला अटक (Jagdish Bandari Arrested) केली आहे. जगदीशवर एका महिला अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
सध्या या घटनेमुळे जगदीशच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 'पुष्पा द राइज' या ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया अॅक्शन ड्रामामध्ये अल्लू अर्जुनच्या मित्र केशवची भूमिका साकारून जगदीशला चांगली प्रसिद्धी मिळाली. पुष्पा फेम अभिनेता जगदीशवर एका अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षांचा जगदीश प्रताप एका ज्युनियर अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या अभिनेत्रीने २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. या अभिनेत्रीच्या आत्महत्येला जगदीश जबाबदार असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी या अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी पोलिसात जगदीशविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासाच्या आधारे बुधवारी पोलिसांनी जगदिशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आत्महत्या केलेल्या अभिनेत्रीने काही लघुपटांमध्ये काम केले होते.
या अभिनेत्रीने २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. पुंजागुट्टा पोलिसांच्या तपासातून अशी माहिती उघड झाली की, जगदीशने मृत अभिनेत्रीची दुसऱ्या पुरुषासोबत असतानाची व्हिडिओ क्लिप 27 नोव्हेंबर रोजी तयार केली होती. जगदीशने कथितरित्या महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिचे वैयक्तिक फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने तिच्या रुममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
या अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर जगदीश फरार झाला होता. अखेर पुंजागुट्टा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या पोलिसांनी पुष्पा फेम अभिनेत्याला रिमांडवर पाठवले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, जगदीशने शेवटी माइथ्री मूवी मेकर्सच्या छोट्या बजेट नाटक 'सत्थी गनी रेंदू येकरलू'मध्ये दिसला होता. तो लवकरच नीतिन आणि श्रीलीला यांच्या 'एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन' आणि लवकरच प्रदर्शित होणार्या ग्रामीण ड्रामा 'अंबाजीपेटा मॅरेज बँड'मध्ये दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.