MP CM Candidate News
नुकताच मध्य प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला तीन राज्यात बहुमत मिळाले. या तिनही राज्यांमध्ये भाजपला अद्याप मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवता आलेला नाही. दरम्यान सध्या मध्य प्रदेशमध्ये विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असले तरी ज्यातिरादित्या सिंधिया यांच्यासह सुमेरसिंग सोलंकी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. बिगर आमदारांनाही संधी मिळू शकते, असे संकेत मिळाले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. ते केंद्रीय मंत्री असून आमदार नसले तरी, आमदार नसलेल्यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, असे संकेत पक्षाने दिल्यापासून सिंधिया यांच्या नावाच्या चर्चेला वेग आला आहे. सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २०२० मध्ये त्यांच्यामुळेच मध्यप्रदेशात भाजपची सत्ता आली होती.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधिया शाळेच्या कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंधिया यांना गुजरातचे जावई म्हटले होते. सिंधिया गुजरातच्या गायवाड राजघराण्याचे जावई आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशासाठी गुजरातच्या गायकवाड राजघराण्यानेही कंबर कसली होती. त्यातच नरेंद्र मोदी यांचे गायकवाड घराण्याशी चांगले संबंध आहेत. तसेच सिंधिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मध्य प्रतेशमधील ते एकमेव नेते असे आहेत, ज्यांच्या घरी राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी भटे दिली आहे. गेल्या एक वर्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जय विलास पॅलेसला भेट दिली आहे.
मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार सुमेरसिंग सोलंकी हे ही पंदप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. मध्य प्रदेश भाजपचे ते प्रवक्ते आहेत. तसेच ते संघाच्या जवळचेही मानले जातात. याशिवाय राज्यातील आदिवासी चेहरा म्हणूनही त्यांची प्रसिद्धी आहे. दरम्यान या निवडणुकीत माळवा-निमार प्रदेशात यावेळी भाजपला अधिक जागा मिळाल्या आहेत. तर मध्य प्रदेशमधील २१ टक्के जनता आदिवासी आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठीच्या पात्रतेत ते फिट बसतात. त्यामुळे त्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.