उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्येत (Ayodhya) बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा (Ram Mandir Opening) पुढच्या वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील आणि जगभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. 3 हजार व्हीव्हीआयपींसह 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli), उद्योगपती मुकेश अंबानी , गौतम अदानी आणि रतन टाटा , बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि लोकप्रिय टीव्ही मालिका 'रामायण' मध्ये भगवान राम भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वीच निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिरातील रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. बुधवारी या ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली. या यादीत 3 हजार व्हीव्हीआयपींसह एकूण 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे ट्रस्टने सांगितले. या पाहुण्यांच्या यादीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत कंगना रनौतचे नाव नाही.
22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधीच आमंत्रित करण्यात आले आहे. आता ट्रस्टने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आशा भोसले आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह ७ हजार पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली आहेत.
या सेलिब्रिटींशिवाय 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती गौतम अदानी हेही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळ आणि तारखेबद्दल बोलताना ट्रस्टने सांगितले की, नवीन राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 ची असणार आहे. सुमारे ३ तास हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, उद्घाटन सोहळ्यासाठी 50 देशांतून प्रत्येकी एक-एक प्रतिनिधी आमंत्रित करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनात प्राण गमावलेल्या 50 कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त देशातील न्यायाधीश, शास्त्रज्ञ, लेखक आणि कवींनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.