‘मुन्नाभाई’ आणि ‘थ्री इडियटस्’ अशा अनेक हिट चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेता बोमन इराणीचा आज वाढदिवस आहे. बोमन इराणींचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांनी वयाच्या ४२व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरीही त्यांनी उशिरा अभिनयात पदार्पण केले असले तरी, त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली. फॅमिली बॅकग्राऊंड नसातानाही खूप चांगली त्यांना प्रसिद्धी मिळाली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोमन इराणींच्या फिल्मी कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया... (Bollywood)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अभिनयामध्ये डेब्यू करण्याआधी बोमन इराणी हॉटेल्समध्ये वेटर तर कधी फोटोग्राफर म्हणून काम करायचे. म्हणतात ना, कोणाचं नशिब कधी कसं पालटेल सांगू शकत नाही. असंच काहीसं बोमन इराणी यांच्यासोबत घडलं. बोमन इराणी जेव्हा फोटोग्राफर म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांची ओळख प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्यासोबत झाली. श्यामक दावर यांनी बोमन इराणी यांची ओळख एका दिग्दर्शकासोबत करून दिली. तेव्हा त्यांनी बोमण यांना थिएटर करण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वत:ची रंगभूमीवर ओळख प्रस्थापित करायला सुरुवात केली. (Bollywood Actor)
बॉलिवूडमध्येही काम करण्यापूर्वी बोमन यांनी दोन हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्या दोन चित्रपटानंतर बोमन यांना बॉलिवूडमध्ये काम मिळाले. मुन्नाभाई एमबीबीएसने बोमन इराणी यांना प्रसिद्धी दिली. त्या आधीही बोमन यांनी दोन चित्रपटांमध्ये काम केले. होते. मुन्नाभाई एमबीबीएसमधील डॉ. आस्थाना, थ्री इडियट्समध्ये वायरस उर्फ प्रोफेसर सहस्त्रबुद्धे सह बऱ्याच चित्रपटांमधून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या संपूर्ण सिनेकारकिर्दित ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.