Payal Gaming Private Video: 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडाली खळबळ

Payal Gaming Private Video viral : 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे .
Video viral
Private Video viralSaam tv
Published On
Summary

युट्यूबर पायल आली अचानक चर्चेत

तिचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाल्याची चर्चा

या प्रकारामुळे तिच्या चाहत्यांची वाढली चिंता

Payal Gaming MMS Leak : सोशल मीडियावर प्रसिद्ध गेमर आणि युट्यूबर पायल अचानक चर्चेत आली आहे. तिचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर तिच्या नावाने तिचा कथित प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे . या प्रकारामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

व्हायरल होणारा प्रायव्हेट व्हिडिओ नेमका पायलचा आहे का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. २५ वर्षीय पायलचा दुबईतून १ मिनिट २० सेकंदाचा कथित प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झालाय. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्याची पडताळणी केली असता व्हायरल होणारा व्हिडओ एआय डिपफेक असल्याचं समोर आलं.

Video viral
लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते पायलच्या मदतीला धावून आले आहेत. व्हायरल व्हिडिओमधील तरुणी ही पायल नसल्याचा दावा चाहते करत आहेत. या व्हिडिओमधील तरुणी पायल नसून एआच्या मदतीने तिच्या चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही पायलवर वैयक्तिक टिप्पणी करू नये, असंही चाहत्यांनी आवाहन केलं आहे.

Video viral
भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

एका चाहत्याने म्हटलं की, व्ह्यूजसाठी कोणाचीही प्रतिमा डागाळणे चुकीचे आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे फेक एआय जनरेटेड आहे. टेक एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, या व्हिडिओच्या माध्यमातून डीपफेक स्कॅम आणि डिजिटल फसवणुकीची शक्यता होण्याची शक्यता आहे. असे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. फसवणुकीसाठी प्रसिद्ध व्यक्तीच्या लोकांच्या चेहऱ्याचा वापर केला जात आहे.

Video viral
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

कोण आहे पायल गेमिंग?

पायल ही भारतातील प्रसिद्ध गेमिंग इन्फ्लुएंसर्सपैकी एक आहे. पायल एक युट्यूबर असून तिचे ४.५ दशलक्षाहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ४.२ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तिचं ई-स्पोर्ट्समध्ये मोठं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com