जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Maharashtra Cabinet : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला.
Maharashtra Cabinet news
Maharashtra Cabinet Saam tv
Published On
Summary

मंत्रिमंडळ बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय

निवडणूक अधिनियम १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे

उमेदवारी अर्जावरील निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल

राज्य सरकारच्या कॅबिनेटची आज बुधवारी बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यात येणार आहे.

Maharashtra Cabinet news
Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम १४ मध्ये, पोट-कलम (२) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते.

Maharashtra Cabinet news
लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील.

Maharashtra Cabinet news
भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com