Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

Gadchiroli News update : गडचिरोलीच्या श्वेताने दुबईत नाव गाजवलं आहे. तिने आशियाई पॅरा गेम्समध्ये ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
Gadchiroli news
Gadchiroli Saam tv
Published On
Summary

दुबईतील आशियाई पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीच्या लेकीचा डंका

श्वेता भास्कर कोवे हिची दुबईत अतुलनीय कामगिरी

वैयक्तिक स्पर्धेत पटकावलं सुवर्ण पदक

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने अतुलनीय कामगिरी केली. तिने या स्पर्धेतील वैयक्तिक स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावून भारताचे नाव उज्ज्वल केलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कढोली गावापासून ते दुबईपर्यंतचा खडतर प्रवास करत दिव्यांगत्वावर मात करून तिने हे यश संपादन केलं. भारतासाठी मेडल पटकावलेल्या या खेळाडूच्या उल्लेखनीय यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळाचे माननीय सचिव अब्दुल जमीर हकीम, शाहीन हकीम, शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे आणि गावचे सरपंच , आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी श्वेताचं मनःपूर्वक अभिनंदन केलं.

Gadchiroli news
Mahavikas Aghadi News : निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, सत्ताधाऱ्यांना धक्का बसणार?

यावेळी श्वेताला पुढील वाटचालीस शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या. आष्टी येथे आगमन होताच तिच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती. तिच्या यशाबद्दल शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत आणि कौतुक सुद्धा करण्यात आलेलं नाही, याची खंत वाटत असल्याचे बबलू हकीम यांनी सांगितले.

कल्याणच्या गिरजेश रजकने रशियात नाव गाजवलं

रशियाच्या मॉस्कोमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन इंटरनॅशनल पावरलिफ्टिंग 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत कल्याणची कन्या गिरजेश रजक हिने भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला. तिने या स्पर्धेत जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत तब्बल ६४ देशांतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. राज्यातून फक्त १० खेळाडू या स्पर्धेत उतरले होते. त्यापैकी गिरजेशने प्रभावी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Gadchiroli news
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार, बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार?

गिरजेश रजकने स्पर्धेत एकूण १ सुवर्ण पदक २ कांस्य पदके गिरिजेश रजक हिने पूर्ण पॉवरलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक पटकावले. तर बेंच प्रेसमध्ये सुवर्ण पदक आणि डेडलिफ्ट या प्रकारात सुवर्ण पदक असे ३ सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर बऱ्याच देशाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. चीन, जपान, कोरिया, भारत, दुबई, दक्षिण आफ्रिका असे अनेक देश सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com