nanded
nanded Politics Saam tv

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

nanded Politics : भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आलाय. नांदेडमध्ये खासदार चव्हणांच्या समर्थकांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.
Published on
Summary

महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आलीये

भाजप खासदार अशोक चव्हाण समर्थकांवर भंगाचा आरोप करण्यात येत आहे

खासदार चव्हाणांच्या घरासमोर इच्छुक उमेदवारांचे बॅनर लावले आहेत

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकेमध्ये निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्व पक्षीय इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. या निडवणुकीसाठी इच्छुक उमदेवारांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. काही राजकीय पक्षाच्या इच्छु उमेदवारांनी तिकीट मिळण्याआधीच छुपा प्रचारही सुरू केला आहे. एकीकडे आज सोमवारी आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांच्या समर्थकांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे समोर आलं आहे.

नांदेडमधील भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागातील चव्हाण समर्थकांचे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष करून खासदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भाजपा इच्छुक उमेदवारांनी बॅनर लावले आहेत.

nanded
परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

नांदेड महापालिकेची आचारसंहिता लागू असताना अशोक चव्हाण यांच्या घरासमोर प्रचाराचे इच्छुक उमेदवारांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. अशोक चव्हाण समर्थकांकडून आचारसंहिता भंग होत असताना कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

nanded
Shocking : कबड्डी सामना सुरू होण्याच्या काही मिनिटं आधीच प्रसिद्ध कबड्डीपटूला घातल्या गोळ्या

संपूर्ण नांदेड शहरासहित अशोक चव्हाण यांच्याही घरासमोर बॅनर लावण्यात आल्याचे समोर आले आहे. या बॅनरवर इच्छुक उमेदवारांचे फोटो देखील आहेत. एका बॅनरवर इच्छुक उमेदवार गिरीश बन्शीलालजी भंडारी यांचा फोटो आहे. भंडारी यांनी निवडणुकीचा जाहीरनामा बॅनरवर छापला आहे. त्यांनी नांदेड महानगरपालिका प्रभाग क्रमांक आठमध्ये केलेल्या कामाची यादी बॅनरवर छापली आहे.

या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून कारवाईची मागणी झाल्यानंतर शहरातील काही भागातून बॅनवर काढण्याचे काम सुरू झालं आहे. मात्र, शहरभर बॅनर लावणाऱ्या समर्थकांवर आयोगाकडून काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com