Shocking : कबड्डी सामना सुरू होण्याच्या काही मिनिटं आधीच प्रसिद्ध कबड्डीपटूला घातल्या गोळ्या

Kabaddi Player Shot Dead : कबड्डी सामना सुरू होण्याआधी प्रसिद्ध कबड्डीपटूच्या गोळ्या घातल्याची घटना घडली. या घटनेत प्रसिद्ध कबड्डीपटूचा मृत्यू झाला.
Kabaddi Player death
Kabaddi Player Shot Dead Saam tv
Published On
Summary

पंजाबच्या मोहालीत कबड्डी सामना सुरू होण्याआधी खेळाडूवर गोळीबार

खेळाडूच्या डोके आणि चेहऱ्यावर गोळी लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू

गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पंजाबच्या मोहालीमध्ये एका कबड्डीपटूला गोळ्या झाडून संपवल्याची घटना घडली आहे. कबड्डी सामना सुरु होण्याच्या काही मिनिटं आधी अज्ञातांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा थरार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. स्पर्धेतील आयोजकापैकी एकाने कबड्डीपटूच्या डोके आणि चेहऱ्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कबड्डीपटूला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान कबड्डीपटूचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मैदानात सामना सुरू होणार होता. त्यावेळी काही लोक कारमधून उतरले. त्यानी मैदानात उतरणाऱ्या संघातील एका खेळाडूवर गोळीबार केला. अज्ञातांनी गोळीबार केल्याने अनेका फटाक्याच्या आवाजाचा भास झाला. मात्र, खेळाडूवरच गोळीबार झाल्याचे समजात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Kabaddi Player death
दक्षिण आफ्रिका टी२० सीरीजसाठी टीममध्ये मोठा फेरबदल; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर, जसप्रित बुमराहचं काय?

गोळीबार केल्यानंतर अज्ञात घटनास्थळावरून तातडीने फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. खेळाडूवर गोळीबार का केला, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

Kabaddi Player death
Mahavikas Aghadi News : निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, सत्ताधाऱ्यांना धक्का बसणार?

कबड्डी स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षकांनी हजेरी लावली होती. पोलीस उपअधीक्षक मैदानात गेल्यानंतर काही तासांनी ही गोळीबाराची घटना घडली. या स्पर्धेसाठी पंजाबी गायक मनिंदर औलख देखील हजेरी लावणार होता. मात्र, स्पर्धेत गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळताच त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.

Q

कबड्डीपटूवर गोळीबार कधी झाला?

A

कबड्डीचा सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com