

बिहारच्या जहानाबादमध्ये घडली हादरवणारी घटना
शाळकरी मुलीवर रिक्षाचालकाकडून अत्याचार
रिक्षाचालकाने मुलीला निर्जनस्थळी नेऊन केलं दुष्कृत्य
बिहारच्या जहानाबाद येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षा चालकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आलं.
बिहारच्या मखदूमपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही हादरवणारी घटना घडली. अल्पवयीन मुलगी परीक्षा दिल्यानतर ट्रेनने मखदूमपूर स्टेशनवर उतरली.त्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षा बूक केली. त्यानंतर ही विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली. मात्र, विद्यार्थिनीला पाहून रिक्षा चालकाची नियत बिघडली. त्याने रिक्षा चुकीच्या दिशेने फिरवली. त्यानंतर निर्जनस्थळी रिक्षा नेऊन थांबवली.
रिक्षाचालकाचा हेतू कळल्यानंतर विद्यार्थिनी आरडाओरड करू लागली. मात्र निर्जनस्थळी ठिकाणी कोणी नसल्याने मदतीला कोणी आलं नाही. याचा गैरफायदा घेत रिक्षा चालकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
अत्याचार पीडित मुलगी घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांना आपबिती सांगितली. त्यानंतर तिचे कुटुंबीय तिला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांना रिक्षा चालकाचे कृत्य सांगताना रडू लागली. यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस स्टेशनमधील कर्मचारी दिवाकर कुमार विश्वकर्मा यांनी सांगितलं की, पीडित मुलीचं जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आरोपी रिक्षा चालकाची ओळख पटवून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी हा भीमपुरा गावात राहायला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत. या घटनेने परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.