

भारताकडून U19 आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानवर ९० धावांनी दणदणीत विजय
दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान चमकले
भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान १५० धावांत आटोपला
दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने अंडर-१९ आशिया कप स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानचा ९० धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानवर विजय मिळवल्याने आता भारताने आशिया कप स्पर्धेत सेमीफायनलच्या पाऊल टाकलं आहे. भारताच्या खेळीवर क्रिकेटप्रेमींकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
भारताने पाकिस्तानला जिंकण्यासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना १५० धावांमध्ये गुंडाळलं. पाकिस्तानच्या हुजैफा अहसन याची ७० धावांची खेळी व्यर्थ ठरली.
भारतासाठी दीपेश देवेंद्रनने ७ षटकात १६ धावा देऊन ३ विकेट घेतले. तर कनिष्क चौहान याने १० षटकात ३३ धावा देऊन ३ विकेट घेतले. पाकिस्तानला धूळ चारल्याने स्पर्धेत भारताचे एकूण ४ गुण झाले आहेत. पॉइंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. वैभव अवघ्या ५ धावा करून तंबूत परतला. वैभवनंतर आयुष म्हात्रे देखील फारशी कमाल करू शकला नाही. दोघांच्या विकेटनंतर एका पाठोपाठ विकेट गेले. पावसामुळे सामना ४९-४९ षटकांचा झाला. भारतासाठी आरोन जॉर्जने ८५ धावांची खेळी खेळली. तर आयुष म्हात्रेने ३८ धावा कुटल्या.
भारत U19 प्लेइंग इलेव्हन:
विहान मल्होत्रा, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंह, हेनिल पटेल वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेट किपर), कनिष्क चौहान, खिलान पटेल, आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज,
पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन:
अहमद हुसैन, फरहान यूसुफ (कर्णधार), हमजा जहूर (विकेटकिपर), हुजैफा अहसन, अब्दुल सुभान, मोहम्मद सय्याम, अली रजा, नकाब शफीक, उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलूच
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.