

जॉन सीनाची WWE मधून निवृत्ती जाहीर
शेवटच्या सामन्यात सीनाचा पराभव
शेवटच्या सामन्यासाठी अनेक दिग्गज रेसलर्सची उपस्थिती
नव्वदच्या दशकातील WWE सुपरस्टार जॉन सीना आता आखाड्यात पाहायला मिळणार नाही. कारण Never Give Up चा मंत्र देणारा जॉन सीनाने WWEमधून निवृत्तीची घोषणा केलीये. जॉन सीनाचा शेवटचा सामना शनिवारी गुंथरच्या विरोधात झाला. त्याने या सामन्यात पराभव पत्कारला. गुंथरशी सामना खेळताना जॉन सीनाने टॅप आउट करत पराभव स्वीकारला.
सामन्यानंतर अनेक दिग्गज रेसलर्सने जॉन सीनाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामन्यानंतर त्याचा एक इमोशनल व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यानंतर त्याचे बुट रिंगमध्ये ठेवण्यात आले. सामन्यानंतर जॉन सीनाने प्रेक्षकांशी संवाद साधत आभार मानले.
WWEच्या रिंगमध्ये रेसलर्सचा विजय-पराजय होत असतो. परंतु आजचा दिवस WWE साठी फार वेगळा होता. जॉन सीनाच्या शेवटच्या सामन्यावेळी कर्ट अँगल, मार्क हेनरी,रॉब वॅन डॅम हे रेसलर्स सामना बघायला आले होते. यावेळी WWE हॉल ऑफ फेमर्स मिशेल मॅकूल आणि ट्रिश स्ट्रॅटस देखील पाहायला मिळाले. द रॉक, केन यांच्यासहित अनेकांनी जॉन सीनाला शेवटच्या सामन्याआधी शुभेच्छा दिल्या होत्या. जॉन सीनाचा शेवटचा सामना झाल्यानंतर त्याचे जुने व्हिडिओ दाखवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा रेसलर गुंथर रिंगमध्ये उतरला. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी गुंथरची हेटाळणी केली. दुसरीकडे सीना त्याच्या आयकॉनिक थीम साँगवर एन्ट्री केली. त्यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. 17 वेळा वर्ल्ड चम्पियन ठरलेल्या सीनाचं रिंगमध्ये प्रतिस्पर्धकानेही स्वागत केलं. या सामन्यात गुंथर सुरुवातीपासून सीनाला वरचढ ठरला. या सामन्यात सीनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुंथरने सीनावर जोरदार हल्ला केला. सीनाचे चाहते त्याचं प्रोत्साहन वाढवत होते.
जॉन सीनाने गुंथरला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या मिनिटाला गुंथरने सीनाला किक आऊट केलं. त्यानंतर सीनाला उचलून आपटलं. सीनाने नंतर हटके डाव टाकला. दुसरीकडे प्रेक्षक जॉन सीनाचं प्रोत्साहन वाढवत होते. त्याचदरम्यान गुंथरच्या पॉवरबॉम्बने जॉन सीनाला नाकी नऊ आणले. शेवटी जॉन सीनाला डोळ्यावर समोर पराभव दिसू लागला. त्याने सीनाने टॅप आउट केलं.
जॉन सीनाने WWE मध्ये २००२ साली एन्ट्री मारली. सर्वाधिक वेळा WWE चॅम्पियनशिप जिंकणारा रेसलर आहे. त्याने तब्बल १७ वेळा चॅम्पियनशिप जिंकलं आहे. जॉन सीनाने रेसलिंगमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने अनेक हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. तसेच त्याने अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.