बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

Beed : बीडमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातात डिझेल टँकर जळून खाक झाला. या अपघाताचा घटनाक्रम समोर आला आहे.
Beed news
Beed Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मांजरसुंबा घाटात एका भीषण अपघाताची घटना घडली. सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे डिझेलचा टँकर तात्काळ उलटला.त्यामुळे या टँकरला भीषण आग लागली.

टँकर डिझेलने भरलेला असल्यामुळे या आगीने काही क्षणातच भयंकर रौद्ररुप धारण केलं. या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही लेनचे वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मांजरसुंबा महामार्ग पोलीस आणि बीड ग्रामीण पोलीस आणि नेकनुर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Beed news
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

टँकरच्या भीषण अपघातामुळे महामार्गावर जवळपास दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर एका बाजूने वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. या अपघाताबाबत अद्याप प्रशासनाकडून कुठलीही घातपात झाली किंवा नाही याचा स्पष्टीकरण आलेलं नाही.

Beed news
पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताला रंगेहाथ सापडला; पोलीस विभागात उडाली खळबळ

बीडच्या यंत्रणेतील गंभीर त्रुटी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ बीड नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आलं होतं. मात्र, बीड पालिकेचा अग्निशमन बंब खराब असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यामुळे वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्यानंतर गेवराईहून अग्निशमन वाहन बोलावण्याची वेळ आली. यानंतर आग आटोक्यात आणण्याचे काम हाती घेण्यात आलं.

मोठा धोका टळला

टँकर उलटल्यानंतर त्यातील डिझेल उताराने कोळवाडी गावाकडे वाहत होते. या डिझेलसोबत आगही वाहत होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. गावापासून थोडे अंतरावरच डिझेलचा प्रवाह थांबला. त्यामुळे गावात आग पसरण्यासारखी मोठी दुर्घटना टळली.

Beed news
भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग; दुचाकीस्वाराने कानशि‍लात लगावली, घटना CCTVत कैद

अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीत होते. मोठा आवाज झाला त्यानंतर आग पसरली आणि धुराचे लोट पाहायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना रस्ता दिसला नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com