Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

Maharashtra political News : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा रंगलीय... शिंदेसेनेच्या मंत्र्यांनं नेमका काय दावा केलाय? ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नेमके कोणाच्या संपर्कात आहेत... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Sharad pawar and uddhav thackeray
Sharad pawar NewsSaam tv
Published On

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय...आणि याला कारण ठरलयं.... मंत्री उदय सामंत यांनी केलेला एक खळबळजनक दावा... ठाकरेसेनेचे अनेक आमदार शिंदेंची भेट घेतात, अस म्हणत... सामंतांनी ठाकरेसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार येत्या 2 महिन्यात फुटणार असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे निष्ठेवर तुम्ही बोलू नये, शिंदेंना भेटणं पाप आहे का? असा सवाल ठाकरेसेनेच्या अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय...

Sharad pawar and uddhav thackeray
दारू पिण्यासाठी बायकोची परवानगी न घेतल्यास नवऱ्याला जेल? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

दुसरीकडे मुंबई महापालिकेनंतर शिंदेसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप एकटं पाडेल, असं म्हणत रोहित पवारांनी सामंतांवर चांगलाच हल्लाबोल केलाय....

Sharad pawar and uddhav thackeray
पुणे शहर पोलीस दलात मेगा भरती, २००० पदांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज; प्रक्रिया कधी सुरु होणार?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाची जाहीर वाच्यता करण्यामागे शिंदेसेना आणि ठाकरेसेना आघाडीवर आहे... शिरसाटांनी ठाकरेसेनेचे 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता... तर आदित्य ठाकरेंनी शिंदेसेनेचे 22 आमदार भाजपचं फोडणार असल्याचं सांगितलं होतं... त्यामुळे राज्यात खरचं पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? या भुकंपाची धग नेमकी कोणाला बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com