

पुणे शहर पोलीस दलात विविध पदांसाठी भरती
२ हजार पदांसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त
पुणे शहरातील सर्वात मोठी पोलीस भरती
पुणे : पुणे शहरातील पोलीस दलाच्या २०२४-२५ च्या भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई पदाच्या सुमारे दोन हजार जागांसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती हाती आली आहे. पुणे शहरातील सर्वात मोठी भरती आहे.
'सकाळ'च्या वृत्तानुसार, पुणे शहर पोलीस दलात १७३३ पोलिस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडस॒मन आणि कारागृह विभागातील १३० शिपाई राबवण्यात येत आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत ७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. दोन हजार पदांसाठी दोन लाख १९ हजार ९२७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
महाराष्ट्रात एकाच दिवशी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नियमानुसार, शिपाई पदासाठी उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास त्यांना एकाच ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना भरतीसाठी एकाच शहराची निवड करावी लागणार आहे.
या प्रक्रियेत अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना इ-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. कारागृह शिपाई पदाची भरती ही पुणे शहर पोलिसांकडूनच घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलीये.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सुरू आहे. याचदरम्यान भरतीची पुढील प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे आता उमेदवारांचं लक्ष लागलं आहे.
कोणत्या पदासाठी किती अर्ज?
पोलिस शिपाई- १७३३- ८६ हजार २४०
वाहनचालक- १०५- ४२ हजार ८९६
कारागृह शिपाई- १३०- ९० हजार ७९१
लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी (उंची, छाती, धावणे)
- कागदपत्रांची पडताळणी
- चालक पदासाठी कौशल्य चाचणी.
अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी भरती प्रक्रियेवर मोठं भाष्य केलं आहे. पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येईल. भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावर सीसीटीव्ही आणि प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे देखील लावण्यात येणार आहे. उमेदवारांनी फसवणूक टाळण्यासाठी खोटे आश्वासन आणि भूलथापांना बळी पडू नये. या संबंधित पोलिस आयुक्त कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असं आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.