रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

kalyan news : रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली.
Kalyan new update
Kalyan news Saam tv
Published On
Summary

रॅपिडो बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अंधाऱ्या ठिकाणी नेऊन गैरकृत्याचा करण्याचा चालकाचा प्रयत्न

तरुणीच्या प्रसंगावधानामुळे कल्याणमध्ये मोठा अनर्थ टळला

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बुक केलेल्या एका तरुणीवर रॅपिडो बाईक चालकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी कल्याण पश्चिमेतून जिमकडे जात होती. सिंडिकेट परिसरातील पोलीस लाईनजवळ पोहोचल्यानंतर, बाईक चालकाने तिला अंधाऱ्या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी त्याने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपीकडे मिरची स्प्रे आणि चाकू असल्याची माहितीही समोर आली आहे.

Kalyan new update
कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

प्रसंगावधान राखत तरुणीने प्रतिकार केला आणि स्वतःची सुटका करून तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत आरोपी रॅपिडो चालकाला पकडून चोप दिला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रॅपिडो कंपनीकडून चालकाची पडताळणी व सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Kalyan new update
कल्याणमध्ये अपघाताचा थरार; बायकोला कामावरून घरी आणताना विपरीत घडलं, दुचाकीस्वार नवऱ्याचा जागीच मृत्यू

...अन् स्थानिकांनी दिला रॅपिडो चालकाला चोप

कल्याणच्या सिंधुगेट परिसरामध्ये पोलीस लाईन आहे.याच पोलीस लाईनमध्ये बाईकवरून हा रॅपिडो चालक तरुणीला अंधारात घेऊन चालला होता. त्यानंतर अंधारात गाडी थांबवल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ मिरची स्प्रे ,चाकू असे हत्यार होते. पीडित मुलीने स्वतःची सुटका करत पळ काढला. त्यानंतर स्थानिकांच्या तावडीत सापडलेल्या रॅपिडो चालकाला स्थानिक नागरिकांनी चोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com