लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

washim news : लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वाशिम पोलिसांनी केली. या टोळीतील काही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
washim news
fruad marriage Saam tv
Published On
Summary

लग्नाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वाशिम पोलिसांनी नवरीसह पाच जणांना घेतलं ताब्यात

आरोपींवर फसवणुकीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात

मनोज जैस्वाल

लग्न लावून घरातील सोनं नाणं घेऊन नवरीसह रफुचक्कर होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार हे लक्षात येताच या टोळीने नवरदेवाच्या आणि नवरदेवाच्या मामाच्या घरात सशस्त्र घुसून धुडगूस घातला. या टोळीने दोन्ही घरातील साहित्याची तोडफोड केली. साहित्य कमी म्हणत चक्क नवरदेवाच्या बापाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसांनी नवरीसह 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 13 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. तर तपासाअंती आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे,अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

washim news
U19 Asia Cup 2025 : नाद करायचा नाय! भारताने पाकिस्तानचा ९० धावांनी धुव्वा उवडला; दीपेश आणि कनिष्कची गोलंदाजी ठरली गेमचेंजर

पोलिसांनी या प्रकरणी लुटमार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार राहुल दिलीप मस्के (32 वर्ष) नागेवाडी (जालना) आणि सतीश विनायक जाधव (वय 29) यांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले, तर आकाश छगन गायकवाड याला जालना येथून तर नवरी मुलगी आणि एक एजंट शांताराम कडूजी खराटे मोहजा यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील एका तरुणाचं लग्न जमत नसल्याने लग्न जमवून देणाऱ्या एका एजंटकडून नाशिकच्या मुली सोबत लग्न जुळवून दिलं होतं. तर 11 डिसेंबर रोजी यांचा विवाह एका मंदिरात पार पडला. लग्नाच्या दोन दिवसाने मुलीच्या माहेरच्या दोन व्यक्ती मुलीला नेण्यासाठी आसेगाव पेन येथे आले. मात्र या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांचे विचार करतात. त्या दोघांनी तिथून पोबारा केला.

washim news
राम मंदिर आंदोलनाचा मुख्य चेहरा काळाच्या पडद्याआड; रामविलास वेदांती यांचं निधन

आपल्या टोळीचा पर्दाफाश होईल. त्यामुळे या टोळीने आणि रात्रीच्या सुमारास तीन गाड्यांच्या माध्यमातून सशस्त्र टोळक्यासह नवरदेवाच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचून नवऱ्याची विचारपूस केली. मात्र नवरदेव आढळला नाही. त्यामुळे या टोळक्याने नवरदेवाच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. हे तोडफोड परिसरातील नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यानंतर त्यांना धमकी दिली. या टोळक्याने नववधूच्या शोधात नवरदेवाच्या मामाचं घर असलेल्या वाशिम तालुक्यातील मोहजा येथे वळवला आणि तिथे पोहोचून त्यांच्या घरातील साहित्याची आणि दुचाकींची नासधूस केली.तिथेही नववधू सापडत नसल्याने या टोळक्याने थेट नवरदेवाच्या वडिलांना आसेगाव पेन येथून उचलून गाडीत टाकले आणि तिथून पोबारा केला.

washim news
धुरळा उडाला! २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, १५ जानेवारीला होणार मतदान

संपूर्ण घटनेनंतर जालनाकडे जाताना या टोळक्यातील काही जणांनी एका खासगी वाहनाला अडवून बेदम मारहाण करत पैशांची लूट केली. या घटनेनंतर वाशिम पोलिसांनी विविध 3 पथक शोधासाठी रवाना केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com