Sejal Pawar: 'ती चूक माझीच होती'; मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरुन उडवली खिल्ली, व्हायरल व्हिडिओनंतर डॉक्टर महिलेने मागितली माफी

Sejal Pawar News: प्रणित मोरेच्या शोमधील व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या डॉ. सेजल पवारने सार्वजनिक माफी मागितली. आपल्या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत तिने माफी मागितली.
Sejal Pawar on pranit more show
SeSejal Pawar on pranit more showSaam Tv
Published On

Sejal Pawar: ३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणावरील वाद अद्याप शांत झालेला नसतानाच कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधला आणखी एक डॉक्टरचा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल नकोत्या कमेंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण आता या व्हायरल व्हिडिओमुळे या डॉक्टरला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सहन करावी लागल्याने तिने एक व्हिडिओ करुन सगळ्यांची माफी मागितली आहे.

डॉ. सेजल पवार ही तीन महिन्यापूर्वी प्रणित मोरेच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान तिने डॉक्टरीचा अभ्यास करताना आलेल्या काही अनुभवांबद्दल सांगताना शरीरशास्त्राच्या अभ्यासादरम्यान घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केला.यावेळी तिने तिच्या सहकाऱ्यांसोबत मृतदेहाचा अभ्यास करत असताना त्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरुन अक्षेपहार्य कमेंट केल्या होत्या. हे तिने प्रणित मोरेच्या शोमध्ये सांगितले आणि तो व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता ३७० रुपयांच्या बिर्याणीच्या वादग्रस्त व्हिडिओसोबत डॉ. सेजल पवारचा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

Sejal Pawar on pranit more show
Sunny Leone: २४०० कोटी रुपयांचा घोटाळा; सनी लिओनीला CIDची नोटीस

वाद वाढताच डॉ. सेजल पवारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली. ती म्हणाली की, त्यांनी स्पष्ट केले की त्या कोणतेही समर्थन किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे, तर आपल्या वक्तव्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी समोर आल्या आहेत. “तीन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ इतका मोठा वाद निर्माण करेल, याची मला कल्पना नव्हती. मात्र, माझ्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिक्रिया मी समजू शकते. मी माझ्या विधानाचे समर्थन करणार नाही. ती चूक पूर्णपणे माझीच होती. सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक होते, याची मला जाणीव झाली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मला त्याबद्दल मनापासून माफी मागते.

Sejal Pawar on pranit more show
Tumbadchi Manjula collection: 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद'नंतर 'तुंबडच्या मंजुळा'ची प्रेक्षकांवर जादू, पाच दिवसात ४ कोटी पार

दरम्यान, ‘३७० बिर्याणी’ प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगानेही कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने संबंधित प्रकरणाची दखल घेत हरियाणा पोलिसांकडे अहवाल मागवला आहे. तसेच कॉमेडियन प्रणित मोरे आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा हिमांशू जांग्रा यांना २२ जून २०२६ रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com