Kartik Aaryan
Kartik Aaryan Instagram @kartikaaryan

'करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट...', Kartik Aaryan ने सुरू केली Bhool Bhulaiyaa 3 ची शूटिंग

Bhool Bhulaiyaa 3 Shooting Start: अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यांच्याशिवाय या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी आणि विद्या बालन या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Published on

Bhool Bhulaiyaa 3:

'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa Movie) आणि 'भूल भुलैया 2'च्या (Bhool Bhulaiyaa 2 Movie) दमदार यशानंतर आता 'भूल भुलैया 3' चित्रपट (Bhool Bhulaiyaa 3 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.

कार्तिक आर्यनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरामधील देवांच्या पाया पडतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याचे सांगितले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'करिअरमधील सर्वात मोठ्या चित्रपटाची सुरूवात करत आहे. शुभारंभ, भूल भुलैया 3' कार्तिकच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Kartik Aaryan
Ibrahim Ali Khan आणि Palak Tiwari पुन्हा दिसले एकत्र, एकाच कारमधून प्रवास; VIDEO व्हायरल

या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'अनेक शुभेच्छा.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'देव कार्तिकला सपोर्ट करेल.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'मंजुलिका आणि रूह बाबा स्क्रीनवर पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' याशिवाय अनेक यूजर्स या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करून आनंद व्यक्त करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

Kartik Aaryan
71st Miss World Winner: झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिजकोव्हा बनली मिस वर्ल्ड; भारताची सिनी शेट्टी टॉप- ४ मधून बाहेर

अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यांच्याशिवाय या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी आणि विद्या बालन या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित दिसणार असल्याचा दावाही अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह हे देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याबाबतचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. त्याचसोबत ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Kartik Aaryan
Sophia Leone Death: अभिनेत्री सोफिया लिओनीचे २६ व्या वर्षी निधन, घरामध्येच आढळला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com