71st Miss World Winner: झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिजकोव्हा बनली मिस वर्ल्ड; भारताची सिनी शेट्टी टॉप- ४ मधून बाहेर

Miss World 2024 : 71व्या मिस वर्ल्डच्या विजेत्याची घोषणा करण्यात आलीय.या स्पर्धेत सिनी शेट्टी भारताचे प्रतिनिधित्व करत होती, पण तिला विजेतेपद मिळवता आले नाही. झेक रिपब्लिक क्रिस्टीना पिजकोव्हा मिस वर्ल्डची विजेती ठरलीय. या स्पर्धेत 120 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यातून क्रिस्टीना पिजकोव्हा विजेती ठरलीय.
Miss World 2024    Krystyna Pyszková
Miss World 2024 Krystyna PyszkováANI
Published On

Miss World 2024 Is Krystyna Pyszková Of Czech Republic:

अख्या जगाला या निकालाची प्रतिक्षा होती तो निकाल समोर आलाय. या निकालाने झेक रिपब्लिकमध्ये आनंद झालाय तर भारताच्या हाती नाराजी आलीय. भारताची सिनी शेट्टी मिस वर्ल्डच्या स्पर्धेत पराभूत झालीय. झेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हाने मिस वर्ल्डचा मुकूट जिंकलाय. (Latest News)

मागील वर्षाची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टीना हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. यावर्षी या सौंदर्य स्पर्धेत 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्वांना मागे टाकत क्रिस्टीना पिजकोव्हाने मुकूट जिंकलाय. गेल्या वेळी पोलंडची रहिवासी कॅरोलिना बिलावस्काने हा मुकूट जिंकला होता. भारताकडून सिनी शेट्टीने या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र तिला हे जेतेपद पटकावता आले नाही. शेट्टी टॉप-८ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली होती, पण टॉप 4 मधून ती बाहेर पडली

सिनीचा जन्म कर्नाटकात झालाय. तर मुंबईत तिचे शिक्षण झाले आहे. सिनीने २०२२ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलाय. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि २०१३ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मेगन यंगने यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. नेहा कक्कर, तिचा भाऊ टोनी कक्कर आणि शान यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी परफॉर्म केलं. या कार्यक्रमामुळे स्पर्धेला चार चांद लागले. भारतात मिस वर्ल्डचे आयोजन २८ वर्षांनंतर झाले. यापूर्वी १९९६ मध्ये भारतात ४६ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचंे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा कार्यक्रम मुंबई शहरात आयोजित करण्यात आला होता.

Miss World 2024    Krystyna Pyszková
Miss world 1996 : अमिताभ बच्चन यांच्यावर ७० कोटींचं कर्ज का झालं? स्वत: बिग बीने सांगितलं कर्जबाजारीपणाचं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com