Ibrahim Ali Khan आणि Palak Tiwari पुन्हा दिसले एकत्र, एकाच कारमधून प्रवास; VIDEO व्हायरल

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan Video: पलक तिवारीने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तर इब्राहिम बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशामध्ये हे दोघेही आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतात.
Palak Tiwari And Ibrahim Ali Khan
Palak Tiwari And Ibrahim Ali KhanSaam Tv
Published On

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलग इब्राहिम (Ibrahim Ali Khan) आणि श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक (Palak Tiwari) नेहमीच चर्चेत असतात. हे कपल नेहमी एकत्र स्पॉट होत असते. दोघेही एकत्र हँगआऊट होतात आणि पार्टी करतात. दोघेही सतत एकत्र दिसत असल्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा सुरू आहेत. अशामध्ये आता हे कपल पुन्हा एकत्र स्पॉट झाले आहे. त्यांनी एकाच कारमधून प्रवास केला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पलक तिवारीने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तर इब्राहिम बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशामध्ये हे दोघेही आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतात. पलक तिवारी ही इब्राहिम अली खानसोबत नाइट आऊटला गेली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान एकाच कारमध्ये दिसत आहेत. इब्राहिम कार चालवत असून पलक त्याच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

शनिवारी रात्री दोघे पुन्हा एकत्र स्पॉट झाले. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा रंगल्या की दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघेही एकाच कारमध्ये एकत्र दिसले. पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात दोघांना कैद केले. यापूर्वी पलकने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले होते की, 'इब्राहिम तिचा चांगला मित्र आहे.' त्यांनी सांगितले होते की, त्यांना फंक्शनमध्ये एकमेकांना भेटायला मजा येते. विशेषतः जेव्हा ते सर्व मित्रांसोबत असतात. यावेळी दोघांनीही एकमेकांना रोज हाय-हॅलो करत नसल्याचे सांगितले.

पलक तिवारीने यावेळी ब्लक कलरचा टॅप टॉप आणि ब्लॅक डेनिम पँट परिधान केली होती. या लूकमध्ये पलक खूपच सुंदर दिसत होती. तर इब्राहिमने ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि ब्लू जिन्स परिधान केली होती. या लूकमध्ये तो हँडसम दिसत होता. दोघांची एकाच कलरची ड्रेसिंग पाहून सगळे चकीत झाले. यावेळी या दोघांनी एकाच कारमधून प्रवास केला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, पलक तिवारीने 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यापूर्वी पलक हार्डी संधूसोबत बिजली म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. त्यांच्या या गाण्याने सर्वत्र खळबळ उडवून दिली. इब्राहिमबद्दल बोलायचे झाले तर, सैफ अली खानचा मुलगा 'सरज्मी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan
'करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट...', Kartik Aaryan ने सुरू केली Bhool Bhulaiyaa 3 ची शूटिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com