Aayush Sharma Car Accident: सलमान खानच्या मेहूण्याच्या कारला भीषण अपघात, खार जिमखान्याजवळील घटना

Actor Aayush Sharma: ही घटना घडली तेव्हा आयुषचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. मद्यधुंद कार चालकाने आयुषच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.
salman khan brother in law aayush sharma
salman khan brother in law aayush sharmaSaam Tv
Published On

Salman Khan Brother In Law Aayush Sharma:

सलमान खानचा (Salman Khan) मेहुणा आणि बॉविवूड (Bollywood) अभिनेता आयुष शर्माच्या (Aayush Sharma) कारला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नुकताच मुंबईमध्ये आयुष्य शर्माच्या कारला अपघात झाला. झूमरिपोर्ट'नुसार, अपघाताच्या वेळी अभिनेता त्याच्या कारमध्ये उपस्थित नव्हता.

ही घटना घडली तेव्हा आयुषचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. मद्यधुंद कार चालकाने आयुषच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये (Aayush Sharma Car Accident) सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खार जिम खान्याजवळ घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने आयुषच्या कारला जोरात धडक दिली. आयुषच्या कारचा ड्रायव्हर सुखरूप आहे. अपघातावेळी कारमध्ये फक्त आयुष शर्माचा ड्रायव्हर उपस्थित होता. आयुष शर्माचा ड्रायव्हर कार घेऊन मुंबईतील गॅस स्टेशनकडे जात होता. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या कार चालकाने आयुष शर्माच्या कारला समोरू धडक दिली.

अभिनेता आयुष हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा नवरा आहे. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या कार अपघाताबाबत आयुष शर्मा किंवा सलमान खान यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आयुष शर्माने सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत लग्न केले असून या कपलला दोन मुलं आहेत.

salman khan brother in law aayush sharma
Shruti Haasan: मला दारू प्यायची सवयी लागली होती पण..., श्रृती हासनने सांगितला ८ वर्षांच्या स्ट्रगलचा तो किस्सा

आयुष शर्माने २०१८ मध्ये आलेल्या 'लवयात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. शेवटी तो 'अंतिम' चित्रपटात दिसला होता. 'लवयात्री' हा चित्रपट सलमान खानच्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नव्हती. सलमान खानचा सुरुवातीपासूनच आयुषवर विश्वास होता. त्यामुळे त्याने त्याला प्रत्येक वेळी संधी दिली.

salman khan brother in law aayush sharma
Jamal Kudu Song: बॉबी देओलला नवी ओळख दिलेल्या 'जमाल कुडू' गाण्याचा काय आहे अर्थ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com