Bobby Deol Song Jamal Kudu
Bobby Deol Song Jamal Kudu Saam Tv

Jamal Kudu Song: बॉबी देओलला नवी ओळख दिलेल्या 'जमाल कुडू' गाण्याचा काय आहे अर्थ?

Bobby Deol Superhit Song Jamal Kadu: सध्या सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर रील्स तयार करून शेअर करताना दिसत आहे. बॉबी देओलच्या स्टाईलमध्ये डोक्यावर ग्लास ठेवून ते रील्स तयार करत आहेत.
Published on

Jamal Kudu Song Meaning:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने (Animal Movie) बॉक्स ऑफिसवर १३ दिवसांत दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट दिवसेंदिस इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत चालला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबतच वर्लडवाइड कलेक्शनमध्येही रेकॉर्डब्रेक केला आहे. या चित्रपटाने ८१७ कोटी रुपये वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे. या चित्रपटाच्या यशादरम्यान बॉबी देओलचे 'जमाल कुडू' हे गाणे सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर रील्स तयार करून शेअर करताना दिसत आहे. बॉबी देओलच्या स्टाईलमध्ये डोक्यावर ग्लास ठेवून ते रील्स तयार करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्यावरच्या रील्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. हे गाणं इराणीमध्ये आहे हे अनेकांना माहिती आहे. पण या गाण्याचा नेमका अर्थ काय होतो हे अनेकांना माहिती नाही. आज आपण सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'जमाल कुडू' या गाण्याचा काय अर्थ होतो हे जाणून घेणार आहोत...

'अ‍ॅनिमल' मधील अनेक गाण्यांप्रमाणेच या गाण्याबद्दल बॉबी देओलच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सध्या सगळीकडे हेच गाणं वाजताना दिसत आहे. 'जमाल कुडू' हे लोकप्रिय इराणी गाणे 'जमाल-जमालू' वरून प्रेरित आहे. हे इराणी गाणं हर्षवर्धन रामेश्वर यांनी पुन्हा कल्पित केले आहे आणि रणबीर कपूर-बॉबी देओलच्या चित्रपटासाठी ते संगीतबद्ध केले आहे.

हे इराणी गाणे १९५० मध्ये खराजेमी गर्ल्स हायस्कूलच्या शिराझी बँडने गायले होते. जे इराणमध्ये इतके लोकप्रिय झाले की सर्वच कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजताना दिसू लागले. 'जमाल-जमालू' नावाची कविता प्रसिद्ध लेखक बिजान यांनीही लिहिली आहे. हे गाणं ऐकायला खूप छान वाटते. पण या गाण्याचा अर्थ देखील तितकाच सुंदर आहे.

Bobby Deol Song Jamal Kudu
Shruti Haasan: मला दारू प्यायची सवयी लागली होती पण..., श्रृती हासनने सांगितला ८ वर्षांच्या स्ट्रगलचा तो किस्सा

जमाल कुडूचा अर्थ असा होतो की, 'अरे, काळ्या डोळ्यांची सुंदरी, तुझ्या क्रूरतेने माझे मन तोडू नकोस. अरे तू मला सोडून नव्या प्रवासाला निघून गेलीस आणि मी मजनूसारखा वेडा झालोय. माझ्या हृदयाशी खेळू नकोस प्रिये.' दरम्यान, 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' या गाण्याला ६ दिवसांत युट्युबवर ३४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Bobby Deol Song Jamal Kudu
Shreyas Talpade ची तब्येत कशी आहे आणि कधी मिळणार डिस्चार्ज?, मित्र सोहम शाहने दिले अपडेट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com