मराठी आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेता श्रेयस तळपदेच्या (Shreyas Talpade) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. लवकरच श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात येणार आहे. श्रेयसचा मित्र आणि चित्रपट निर्माता सोहम शाहने ही माहिती दिली आहे.
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे १४ डिसेंबरला अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. सध्या श्रेयसच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्याला डिस्चार्ज मिळावा (Shreyas Talpade Discharged) यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे सोहम शाहने सांगितले. नुकताच सोहमने रुग्णालयामध्ये जाऊन श्रेयसची भेट घेतली. ज्यावेळी श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या रात्री देखील सोहम त्याच्यासोबत होता. सोहम शाहने ETimes शी बोलताना सांगितले की, 'श्रेयस तळपदेला रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी डिस्चार्ज दिला जाईल.'
सोहम शाहने पुढे सांगितले की, 'ज्या रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात आले त्या रात्री मी त्याला भेटायला गेलो होतो आणि आजही मी तिथे गेलो होतो. श्रेयसला त्याच्या त्याच जुन्या स्टाईलमध्ये हसताना आणि बोलताना पाहून खूप बरं वाटलं. वेळीच दखल घेतल्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. त्याची पत्नी दीप्तीचे देखील आभार कारण तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. त्या दोघांनाही हा एक चमत्कार वाटला की, ट्राफिकचा सामाना करत त्यांनी हॉस्पिटल गाठले. देवाचे आभार मानतो की तो बरा होत आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत.'
दरम्यान, अभिनेता श्रेयस तळपदेने 'इकबाल' आणि 'गोलमाल रिटर्न्स' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो लवकरच कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो शूटिंगवरून घरी परतला होता. वेळीच उपचार मिळाल्यामुळे सुदैवाने काही झाले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.