मनोज जरांगे पाटील यांना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी ( २५ नोव्हेंबर) रात्री मनोज जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
राज्यभर दौरे, विविध ठिकाणी सभा आणि सततचा प्रवास यामुळे मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर येताना मराठा बांधवांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. मी स्वागताला जेसीबी लावू नका, असे सांगत होतो. मात्र समाजाचे प्रेम आहे. फुले टाकू नका सांगितले तरी टाकतात. समाज मला जीव लावत आहे. तुमच्यावर का कोण फुले टाकतील, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्ही थंड होत नसतो. सरकारने थांबायला सांगितले आहे. तुमच्या लोकांना थांबवा ते खूप फडफड करत आहेत. आम्ही सबुरीने घेण्याचा सल्ला ऐकतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यात जात पाहणार नाही. शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.सरकारला हात जोडून विनंती आहे, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असं जरांगे यांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.