Winter Session: ४ डिसेंबरपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात; वेळापत्रकावरुन विरोधकांची नाराजी

Maharashtra Assembly Winter Session: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या विषयांवरुन अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Sessionsaam tv
Published On

सुरज मासुरकर, मुंबई, ता. २९ नोव्हेंबर २०२३

Maharashtra Assembly Winter Session 2023:

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सात डिसेंबरला सुरू होणारे हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची (Winter Session) तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानुसार आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

१९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अधिवेशनावरुन नाराजी व्यक्त केली आहे. "किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सरकारने पळ काढला आहे. सरकार राज्यातील प्रश्नांबाबत गंभीर दिसत नाही..." अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Session
Unseasonal Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; लाखो हेक्टरवरील पिकांची माती, बळीराजा संकटात

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या विषयांवरुन अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Assembly Session
Amravati News: पोटच्या मुलाला विष पाजून आईनं स्वत: संपवलं जीवन; अमरावतीमधील हृदयद्रावक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com