Kangana Ranaut At Eid Party: बाबो! अर्पिता-आयुषच्या ईद पार्टीला कंगनाची हजेरी

Kangana Ranaut Attended Salman Khan's Eid Party: कंगना रनौत गेल्या वर्षीही अर्पिताच्या ईद पार्टीत दिसली होती.
Kangana Ranaut At Eid Party
Kangana Ranaut At Eid PartySaam TV

Kangana Ranaut Shocked Netizens: सलमान खानची बाही अर्पिता खान आणि तिचा पती आयुष्य शर्मा यांनी रमजान ईद निमित्त पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या पार्टीला उपस्थित होते. पण या पार्टीला बॉलिवूडमधील अशी एक व्यक्ती उपस्थित होती जिला पाहून सर्वांना धक्का बसला.

अर्पिता खानच्या ईद पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. बी-टाउनपासून ते टीव्ही जगतातील जवळपास सर्वच सेलिब्रिटी या पार्टीत दिसले. दरम्यान, या पार्टीला एन्ट्री झाली ती बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतची.

कंगना जेव्हा गाडीतून बाहेर आली तेव्हा तिला पडून लोकांना धक्काच बसला. कंगनाने मोहरी रंगाचा अनारकली सूट घातला होता, त्यात भरपूर नक्षीकाम केलेली ओढणी घेतली होती. कंगनाने ओल्ड स्टाईल हेअर स्टाईल केली होती.

Kangana Ranaut At Eid Party
Katrina Kaif Video: विकी कौशल-कतरीना कैफ प्रेग्नंट? ईद पार्टीत लपवत होती बेबी बंप

कंगना रनौत गेल्या वर्षीही अर्पिताच्या ईद पार्टीत दिसली होती, कदाचित तुम्हाला आठवत असेल. तेव्हाही लोक तिला पाहून अवाक् झाले होते. दरम्यान कंगनाला पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली, तिला तिच्या जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. कंगनाने सलमान खानवर निशाणा साधला होता.

कंगनाविषयी नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिले होते की, "ती रोज बॉलिवूडमधील खानांविषयी उलटसुलट बोलते, आता ती पार्टीला कशी गेली." दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, ज्याला तुम्ही रोज शिव्याशाप देता, त्यांच्या ईद पार्टीत सहभागी होण्यासाठी आली आहे.

काही लोक असेही होते ज्यांनी कंगनाची बाजू घेतली. कंगना नेहमीच सलमान खानला सपोर्ट करते. तर काहींनी आठवण करून दिली की कंगनाने मागच्या वर्षीही ईद पार्टीला हजेरी लावली होती, त्यामुळे आश्चर्यचकित होण्याची गरज नव्हती, ईद पार्टीला येण्याची तिची ही पहिली वेळ नाही.

कंगनाचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्याने तेजस, 'इमर्जन्सी' आणि चंद्रमुखी 2 या चित्रपटांचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com