Aayush Sharma Film Teaser: अभिनेता आयुष शर्माच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, थरारक व्हिडिओ पाहून बसेल धक्का!

अभिनेता आयुष शर्माच्या 'अनटायटल' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, अॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेता.
Aayush Sharma
Aayush SharmaInstagram @aaysharma

मुंबई: बॉलीवूड अभिनेता आयुष शर्माला आपण लव यात्री आणि अंतिम: द फायनल ट्रुथ या चित्रपटांच्या माध्यमातून पाहिले आहे. त्याची आणखी एक ओळख म्हणजे बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा तो मेहुणा आहे. छोट्या बहिणीच्या नवऱ्याला सलमान नेहमी सपोर्ट देखील करतो. आयुषने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्याच्या तिसऱ्या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. सलमान खानने आयुषने शेअर केलेल्या चित्रपटाचा हा टीजर स्वतःच्या सोशल मीडियावर सुद्धा शेअर केला.

टीजर शेअर करत सलमान खानने आयुषला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यावर आयुषने सलमानला धन्यवाद म्हटले आहे. टीजरची सुरूवात जंगलच्या ड्रोन शॉटने होते. त्यानंतर पावसात भिजणार आयुष आपल्याला दिसतो. त्याच्या हातातील हत्याराने तो खून करत आहे. त्याच्यामागे एक सावली चमकताना आपल्याला दिसते. त्यानंतर एक सुंदर मुकुट स्वतःच्या डोक्यात घालतो. 'द हंट बेगिंन्स' या वाक्याने टीजरचा शेवट होतो.

आयुष पहिल्यांदाच आपल्याला अशी भयंकर भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा हा आगामी चित्रपट अॅक्शन चित्रपट असणार आहे. टीजरमध्ये आयुष त्याचे अॅब्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आयुषने त्याच्या फिटनेसवर भरपूर काम केले असल्याचे टीजर पाहून लक्षात येते. टीजर पाहिल्यावर असे वाटते की, चित्रपटामध्ये साऊथ ट्रेंड फॉलो करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु आयुष शर्माचा मायथो मॉडर्न अॅक्शन अॅडव्हेंटर २०२३ साली प्रदर्शित होणार आहे.

Aayush Sharma
Bigg Boss Season 4 : बिग बॉसच्या घरात रंगणार 'गरबा नाईट'; स्पर्धकांचा डान्स चर्चेत

अभिनेता आयुष शर्मा त्याच्या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला, “AS03 हा एक खूप खास चित्रपट आहे, ज्याची कॉनसेप्ट खूप कमाल आहे, ज्यामुळे या कथेशी मी लगेच कनेक्ट झालो. ही एक खूप वेगळी, इंटरेस्टिंग आणि चित्तथरारक फिल्म आहे, उत्कृष्ट व्हिजन आणि कॉनसेप्ट प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी एक स्किल टीम त्यामागे काम करत आहे. मी रोज या चित्रपटावर काम करता असताना सरप्राईज होत असतो, आणि प्रेक्षकांसह हे जग एक्सप्लोर करण्यासाठी मी एक्साईड आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com