Rakhi Sawant : "पहिल्यांदा राखी सावंतने जे केले ते सगळ्यांना आवडले..."; VIDEO होतोय तुफान व्हायरल

Rakhi Sawant Viral Video : ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरात धिंगाणा घालताना दिसत आहे. मात्र तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती गरजूंना मदत करत आहे.
Rakhi Sawant Viral Video
Rakhi Sawantsaam tv
Published On
Summary

अलिकडेच राखी सावंतने 'बिग बॉस मराठी 6'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

राखी सावंत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते.

सध्या राखी सावंतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

बॉलिवडूची ड्रामा क्वीन राखी सावंत कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अलिकडेच ती 'बिग बॉस मराठी 6'मध्ये गेली आहे. तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात. सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन सर्वच विषयांवर राखी बेधडक बोलताना दिसते. कायम तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र सध्या तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखी सावंत रस्त्यावरील दोन गरजू महिलांना मदत करताना दिसत आहे. तिने एका महिलेचा फोन नंबर घेतला आणि 5,000 रुपये तिच्या अकाउंटमध्ये पाठवले. त्यानंतर त्यातील एका आजीने राखी सावंतला किस देखील केली. राखीनेही आजीला मिठी मारली. व्हिडीओत दोन महिलांसोबत त्यांचा एक लहान मुलगी देखील दिसत आहे. राखी मदत केल्यानंतर त्या महिलांना म्हणते की, "हिच्यावर उपचार करा. तिला चांगले शिक्षण द्या. मी तुला नेहमी पैसे देत राहीन. तु स्वतःला एकटी समजू नकोस..." त्यानंतर राखी सावंत त्या दुसऱ्या महिलेला देखील मिठी मारते.

चाहत्यांच्या कमेंट्स

राखी सावंतच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करताना दिसत आहे. राखी सावंतचे खूप कौतुक करत आहेत. राखी सावंतची ही कृती नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. "खूप सुंदर काम केले", "राखी सावंत चांगली महिला आहे...", "तू माझी आवडती आहेस राखी सावंत", "पहिल्यांदा राखी सावंत यांचा व्हिडीओ आवडला", "पहिल्यांदा राखी सावंतने जे केले ते सगळ्यांना आवडले...", "राखी सावंतला कितीही वाईट बोलो तरी ती मनाची खूप चांगली आहे..." अशा भरभरून कमेंट्स व्हिडीओवर येताना दिसत आहेत.

बिग बॉसमध्ये एन्ट्री

राखा सावंतने अलिकडेच 'बिग बॉस मराठी 6'मध्ये एन्ट्री घेतली आहे. तिची बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. घरात गेल्यापासून राखी सावंत घरातील इतर सदस्यांशी वाद घालताना दिसत आहे. नागिन रुपात राखी सावंतने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. तसेच घरात गेल्यावर ती पहिल्यांदा तिने तन्वी कोलतेशी पंगा घेतला आहे. बिग बॉसच्या घरात तिची आणि सागर कारंडेची चांगली मैत्री झालेली पाहायला मिळत आहे.

Rakhi Sawant Viral Video
Shreyas Talpade : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल, गावकऱ्यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com