Shreyas Talpade : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल, गावकऱ्यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

FIR Against Shreyas Talpade : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
FIR Against Shreyas Talpade
Shreyas Talpadesaam tv
Published On
Summary

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे.

अभिनेत्यावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्याकाही दिवसांपासून चेक बाउन्सप्रकरण खूप गाजत आहे. यासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाउन्सप्रकरणात तुरुंगात अडकला आहे. अशात आता मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध मैनपुरीतील भोगांव येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप यात आहे. या 12 लोकांमध्ये श्रेयस तळपदेसोबतच अरविंद त्रिपाठी, संजय मुदगिल, पंकज अग्रवाल, समीर अग्रवाल, अजय श्रीवास्तव, आरके सेट्टी, शबाब हुसेन, सुप्रिया, नरेंद्र नेगी, अनुज जैन आणि सानिया अग्रवाल यांचा समावेश आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 10 फेब्रुवारीला तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार भोगांव येथील मोहल्ला मिश्राणा या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने केली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

सर्व प्रकरणाचा पोलीस तपास घेत आहेत. शहरातील मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या शाखेतमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केला असल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. यात त्याचे साथीदार सहभागी होते.

नेमकं प्रकरण काय?

2015 मध्ये सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी एलयूसीसी बँकेची शाखा उघडली. यात शेकडो लोकांनी / गावकऱ्यांनी गुंतवणूक केली. कालांतराने नागरिकांनी पैसे मागितले तेव्ह समीर-सानियाने देण्यास नकार दिला. तसेच त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर 2024 मध्ये ती बँक बंद झाली. त्यामुळे 14 जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. आता नागरिकांचे लाखो रुपये बँकेत अडकले आहेत.

FIR Against Shreyas Talpade
Salman Khan : आता सलमान खानच्या जवळच्या नातेवाईकाला जीवे मारण्याची धमकी, ईमेल केला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com