...म्हणे कायद्याचे रक्षक! पोलीस मुख्यालयातील कर्मचारी गांजा तस्करांच्या टोळीत, 4.75 कोटींचा मुद्देमाल जप्त

Rs 4.75 Crore Ganja Seized NDPS Act Maharashtra: बुलढाणा पोलीस मुख्यालयातील कर्मचारीच गांजा तस्करीत सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा. छत्तीसगडमध्ये 4.75 कोटींचा गांजा जप्त, एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल.
Police investigation exposes inter-state ganja smuggling racket involving Buldhana Police staff.
Police investigation exposes inter-state ganja smuggling racket involving Buldhana Police staff.Saam Tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: आतापर्यंत आपण गांजा तस्करी करताना पोलिसांनी आरोपींना पकडण्याच ऐकलं आहे. मात्र आता कोट्यावधीच्या गांजा तस्करीत बुलढाणा पोलीस दलातील नियंत्रण कक्षातील प्रदीप मुसदवाले हा कर्मचारी सहभागी असल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील कोमखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 कोटी 75 लाख रुपयांचा गांजा ओरिसातून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात आणताना पकडला गेला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अक्षय भोरजे व शुभम आवटे या दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणात छत्तीसगडमधील कोमाखान पोलीस स्थानकाच्या हद्दीत FIR क्र 03/2026 नुसार NDPS ऍक्ट अंतर्गत कलम 20(ख)(2)(C), 29 आणी संबंधित कलमांसह कलम 338, 336(3),340(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Police investigation exposes inter-state ganja smuggling racket involving Buldhana Police staff.
Accident News : प्रसिद्ध उद्योजकाच्या मुलानं दारूच्या नशेत कार दामटवली, अनेकांना उडवलं; ६ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील एन डी पी एस पथकाने केलेल्या चौकशीअंती या गांजा तस्करीत तिसरा आणि मुख्य आरोपी आढळला आणि तो आरोपी बुलढाणा पोलीस दलातील नियंत्रण कक्षातील प्रदीप मुसदवाले हा असल्याच निष्पन्न झालं. बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी आणि विक्री होत असून यावर बुलढाणा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात?

Police investigation exposes inter-state ganja smuggling racket involving Buldhana Police staff.
Crime: १००० रुपयांत बायकोला विकलं, जंगलात नेलं; नवऱ्याच्या मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

पोलीस दलातीलच कर्मचारी आणि त्यातल्या त्यात पोलीस मुख्यालयातीलच कर्मचारी जर गांजा तस्करीत सहभागी होत असतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच नियंत्रण नाही का? असे सवाल आता उपस्थित राहत आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणी आरोपी प्रदीप मुसदवाले याला पोलीस दलातून बडतर्फ केले असून यामुळे मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com