Rakhi Sawant On Amitabh Bachchan: टीव्हीची "ड्रामा क्वीन" राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या विधानांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. राखी तिच्या वैयक्तिक वादांमुळे नेहमीच चर्चेत असते, पण यावेळी तिने बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबावर निशाणा साधला आहे. अलिकडेच एका मुलाखतीत राखी सावंतने अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्याबद्दलच नकोते बरळली आहे.
राखी सावंतच्या विधानाने चाहते थक्क
राखी सावंत अलीकडेच फिल्मी ज्ञानच्या पॉडकास्टवर मुलाखात दिली, जिथे तिला इंडस्ट्री आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. अभिनेत्रीने अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्याबद्दलही मत व्यक्त केले. या तिघांवर चर्चा करताना राखीने जया बच्चनच्या कडक स्वभावाबद्दल आणि तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अगदी स्पष्ट विधाने केली आहेत.
"अमित जी, रेखा जी स्वीकारा..."
फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत, कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्यांच्या लव्ह लाईफवर थेट टिप्पणी केली. राखीच्या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ती म्हणाली, "अमितजी, रेखाजींना स्वीकारा... हा दोन बायका असण्याचा काळ आहे. पाहा, तुमचे फक्त एकच आयुष्य आहे, ते जगा...
जया बच्चन यांच्या फॅशन सेन्स आणि लूकबद्दल प्रश्न उपस्थित
राखीने पुढे जया बच्चन यांच्यावर थेट टीका केली आणि म्हणाली, "मला समजत नाही की अमिताभजींनी जया बच्चन यांची निवड का केली. "त्यांनी रेखाजींना का निवडले नाही?" कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनने जया बच्चन यांच्या फॅशन सेन्स आणि लूकवर टीका करत म्हटले, "जया बच्चन सलवार कमीजही घालत नाहीत." इतके करोडपती आणि अब्जाधीश आहेत. जया बच्चन, मला तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित करा आणि मी तुम्हाला एक छान सूट भेट देईन. तुमचे केस रंगवा आणि तुमच्या चेहऱ्याला थोडेसे आकर्षक करा. तुमचा नवरा अमिताभ बच्चन आहे.
रेखा आणि जया यांच्यापैकी कोणाची निवड करेल राखी सावंत?
राखी सावंत पुढे म्हणाली, "जर कोणी मला जया आणि रेखा यांच्यापैकी कोणाची निवड करायला सांगितले तर मी रेखाची निवड करेन." राखी सावंत यांचे हे विधान आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही जण याला मस्करी समजत आहेत, तर बच्चन कुटुंबाचे चाहते याचा अनादरपूर्ण म्हणत आहेत. सध्या, राखी सावंतच्या विधानावर बच्चन कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.