Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

Suraj Chavan Wife Maternity Photoshoot : बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. नुकतेच त्याच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट झाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Suraj Chavan Wife Maternity Photoshoot
Suraj Chavansaam tv
Published On
Summary

सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार

सूरजच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल

सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता आहे.

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता गुलीगत किंग सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. अलिकडेच सूरजची मानलेली बहिण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने एक व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. सूरजच्या लग्नापासून ते आता संजनाच्या डोहाळे जेवणापर्यंत जान्हवी कायमच सूरजसोबत पाहायला मिळाली. सूरज चव्हाण आणि संजना आता लवकरच पालक होणार आहेत. अशात संजनाचा मॅटर्निटी फोटोशूटचा व्हिडीओ समोर आला आहे.

सूरच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट

डोहाळे जेवणानंतर सूरजच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट थाटामाटात पार पडले आहे. makeover_by_adiii या इन्स्टाग्राम पेजवर संजनाच्या मॅटर्निटी फोटोशूटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मॅटर्निटी फोटोशूटसाठी संजनाने सुंदर गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. ती जणू परी वाटत आहे. मोकळे केस, हेवी मेकअप आणि डोक्यावर फुलांचा टिआरा घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

व्हिडीओत संजाना फुलांची उधळण करताना, बेबी बंप फ्लॉन्ट करत चालताना आणि खास पोज देताना दिसत आहे. नेटकरी या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहे. दोघांना शुभेच्छा देत आहेत. संजनाच्या हातात घड्याळ आणि गळ्यात छोटे मंगळसूत्र दिसत आहे. मिनिमल ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. तसेच हातावर तिने मेहंदी देखील काढली आहे.

सूरज चव्हाण लव्ह स्टोरी

सूरज चव्हाणचे लव्ह मॅरेज आहे. त्याने आपल्या चुलत मामांची मुलीसोबत म्हणजेच संजनासोबत लग्नगाठ बांधली. गुलीगत किंग सूरज चव्हाण आणि संजना २९ नोव्हेंबर २०२५ लग्न बंधनात अडकले. त्याचा शाही विवाह सोहळा बारामतीत पार पडला.

Suraj Chavan Wife Maternity Photoshoot
Dipika Kakar Video : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्कर पुन्हा हॉस्पिटलमध्ये; पती शोएबने सांगितले नेमकं काय झाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com