दीपिका कक्कर पुन्हा हॉस्पिटलला गेली.
2025 मध्ये दीपिका कक्करची कॅन्सरवर शस्त्रक्रिया झाली होती.
पती शोएबने दीपिकाचे हेल्थ अपडेट दिले.
टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे. दीपिका कक्करवर नुकतीच उपचारांचा एक भाग असलेल्या 'इन्फ्युजन' (औषध देण्याची प्रक्रिया) करण्यात आली आहे. याची माहिती दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने आपल्या व्लॉगद्वारे चाहत्यांना दिली आहे. दीपिका कक्करची तब्येत आता कशी, जाणून घेऊयात. जून 2025 मध्ये दीपिका कक्करला स्टेज 2 यकृताचा कर्करोग/ कॅन्सर झाला होता, तेव्हा तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
व्लॉगद्वारे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हॉस्पिटलमध्ये गेल्याचे दिसत आहे. रुग्णालयातून माहिती देताना शोएबने सांगितले की, दीपिकाच्या शरीरातील लोहाची (iron) पातळी थोडी कमी होती, त्यामुळे तिला 'आयव्ही' (IV) द्वारे iron देण्यात आले. अभिनेत्याने पुढे सांगितले की, "गेल्या वेळी आम्हाला पूर्ण रात्र रुग्णालयात राहावे लागले होते. पण यावेळी आम्ही हे 'डे-केअर' होते म्हणून पूर्ण करू शकलो, जेणेकरून आम्ही आज रात्री रुहानकडे घरी पोहोचू शकू..."
व्लॉगमध्ये दीपिकाने सांगितले की, "सर्व काही ठीक आहे. मला फक्त थोडी चक्कर आल्यासारखे किंवा गुंगी आल्यासारखे वाटत आहे कारण त्यांनी मला आधी एक औषध दिले होते, ज्यामुळे गुंगी येते. बस एवढंच. बाकी सर्व काही अगदी ठीक आहे. आता दर २०-२१ दिवसांनी हे करावे लागते..." व्लॉगच्या शेवटी शोएबने आनंदाने सांगितले की, दीपिकाचे इन्फ्युजन यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
दीपिका आणि शोएबच्या या व्लॉगवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दीपिकाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.