Kapoor Wedding : कपूर खानदानाची लेक चढली बोहल्यावर; बॉयफ्रेंडसोबत घेतले सातफेरे, पाहा PHOTOS

Anshula Kapoor Wedding: कपूर खानदानाची लेक लग्न बंधनात अडकली. लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Anshula Kapoor Wedding
Kapoor Weddingsaam tv
Published On
Summary

कपूर खानदानाची लेक लग्न बंधनात अडकली

बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो, व्हिडीओ व्हायरल

कपूर खानदानात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कपूर खानदानाची लेक नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूरने बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत लग्न केले आहे. दोघांनी नवीन संसाराला सुरुवात केली आहे. लेकीच्या लग्नामध्ये बोनी कपूर खूपच भावुक झाले.

अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा लग्न सोहळा सोमवारी (६ जुलै २०२६) ला थाटामाटात मुंबईत पार पडला. अंशुला कपूर ही बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण आहे. अंशुला कपूरच्या लग्नाला सर्व कपूर कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. सर्वांनी डान्स, मजा-मस्ती केली. या शाही लग्न सोहळ्याला कपूर कुटुंब आणि जवळचे मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते.

अंशुला कपूरची पोस्ट

अंशुला कपूरने आपल्या नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं की, -

"०६.०७.२०२६

सर्व लोकांमध्ये

सर्व ठिकाणी

सर्व वेळी

तो 'तूच' होतास...

आणि कसं काही माहित नाही

प्रत्येक वळणावर, सरप्राईजमध्ये

अजूनही 'तू' आहेस...

मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडते

माझे सर्वात सुरक्षित ठिकाण

माझी सर्वात सोपी निवड

फक्त 'तू' आहे..."

अंशुला कपूरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट करून नवीन जोडप्याला आशीर्वाद आणि प्रेम देत आहेत. जुलै २०२५ मध्ये अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा साखरपुडा झाला होता. तसेच सोशल मीडियावर बहिणीच्या लग्नानंतर अर्जुन कपूर बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Anshula Kapoor Wedding
Gautami Patil : "पावसाच्या थेंबापेक्षा तुझा ग्लो लय भारी..."; गौतमी पाटीलला पावसात नाचताना पाहून चाहत्याचे भान हरपले |VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com