आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

Gurugram Girlfriend Burnt Alive By Married Boyfriend: गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहित प्रियकराने आपले लग्न लपविल्याचे उघड झाल्यानंतर 23 वर्षीय प्रेयसीला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
Police investigate the scene as a shocking case of a woman being burnt alive by her boyfriend in Gurugram sparks outrage.
Police investigate the scene as a shocking case of a woman being burnt alive by her boyfriend in Gurugram sparks outrage.saam tv
Published On

गुरुग्राममध्ये एका विवाहित तरुणाने किरकोळ वादानंतर आपल्या 23 वर्षीय प्रेयसीला जीवंत जाळून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून सेक्टर 9 ए पोलिसांनी आरोपी तरुणआला अटक केली आहे. कोर्टाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Police investigate the scene as a shocking case of a woman being burnt alive by her boyfriend in Gurugram sparks outrage.
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला त्याच्या प्रेयसीला जीवंत जाळून हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना दोघांमध्ये झालेल्या वादानंतर घडली. संबंधित महिलेला तिच्या नवऱ्याचे आधीच लग्न झाले असल्याचे कळाले त्यानंतर हा वाद झाला. ही मुलगी बसई गावची रहिवासी होती दिव्या कटारिया(23) असे या मुलीचे नाव होते. सुनील कुमार उर्फ नोनी (वय 35) हा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गुभाना गावचा रहिवासी आहे. त्याला बुधवारी अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा आदेश देण्यात आला.

Police investigate the scene as a shocking case of a woman being burnt alive by her boyfriend in Gurugram sparks outrage.
Lalit patil Drug Case | आमदार Ravindra Dhangekar यांचं Pune पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन

27 जून रोजी उपचारादरम्यान दिव्या कटारियाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईक विकास यांनी 30 जून रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, 22 जून रोजी दिव्याने त्यांना सांगितले होते की सुनीलने तिला पेटवून दिले आणि जर तिने कोणाला खर सांगितले तर तिच्या आई आणि बहिणीची देखील हत्या करेल अशी धमकी दिली.

Police investigate the scene as a shocking case of a woman being burnt alive by her boyfriend in Gurugram sparks outrage.
Pune Sanjay Kakade News | मुरली मोहोळ यांच्या उमेदवारीला माझा विरोध नाही पण.. | Marathi News

19 जून रोजी ‘आर्टेमिस हॉस्पिटल’कडून माहिती मिळाली होती की बसई गावातील 23 वर्षीय दिव्या कटारिया हिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारांनंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर पोलिस देखील रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी तिच्या आईशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी याबाबत कुठलीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचे ते म्हणाले.

Police investigate the scene as a shocking case of a woman being burnt alive by her boyfriend in Gurugram sparks outrage.
Missing Case : उर्दू शाळेच्या ४ अल्पवयीन मुली झाल्या होत्या बेपत्ता; परराज्यात लागला ठावठिकाणा, ३ दिवस कुठे होत्या?

18 जून रोजी दिव्या कटारिया सुनील कुमारच्या सोन्याच्या दुकानात गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला, कारण तिला सुनील आधीपासून विवाहित असल्याचे समजले होते. दोघांमध्ये कडक्याचे भांडण सुरू झाले आणि याचदरम्यान सुनिलने दिव्याच्या अंगावर रॉकेल ओतले. वाद मिटवावा म्हणून दिव्याने एक फ्लॅट बुक केला, जिथे दोघे रात्री थांबले. मात्र 19 जूनच्या सकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वेळी सुनीलने तिला पेटवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com