Crime News : 'आजोबांकडून नातवावर जादूटोणा', मांत्रिकानं सांगताच मुलाने कुऱ्हाडीने वार करून बापाला संपवलं!

Son Killed Father In Suspect of black magic : जादुटोण्याच्या संशयावरून मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आलीय.
 मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना
Crime Newssaam tv
Published On

मुंबई : अंधश्रद्धेपोटी नात्यातील व्यक्तींची हत्या करायला देखील लोक मागे पुढे पाहत नसल्याचं समोर आलंय. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात घडलाय. येथे एका व्यक्तीने भूताटकी केली म्हणून सख्ख्या बापाची हत्या केलीय. मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याने वडिलांचा खून केलाय. उत्तर प्रदेशमध्ये अंधश्रद्धा आणि जादूटोण्याशी संबंधित गुन्हेगारीच्या घटना थांबताना दिसत नाहीत.

आरोपीने कुऱ्हाडीने वार करत वडिलांना संपवलं. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. परंतु, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस आरोपी आणि (Son Killed Father) त्याला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनभद्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय सोनेश्वर खरवार, अशी मृत व्यक्तीची ओळख आहे.

नेमकं काय घडलं?

वडिलांची हत्या करण्याचं भयंकर कृत्य रमाशंकर उर्फ ​​रवी खरवार याने केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमाशंकरचा मुलगा अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर कोणीतरी जादूटोणा केलाय, (Suspect of black magic) असा रमाशंकरला संशय होता. त्यामुळे तो उपचारासाठी मांत्रिकाकडे जायचा. बराच वेळ उपचार करूनही मुलगा बरा झाला नाही, तेव्हा त्याने भूतबाधा का झाली, असा मांत्रिकाला विचारलं.

या समस्येचे मूळ कारण त्यांच्या घरातच असल्याचं मांत्रिकाने सांगितलं. त्याच्याच वडिलांनी मुलावर जादूटोणा केलाय, असं सांगितलं. हा प्रकार समजल्यानंतर आरोपी रागात घरी आला अन् वडिलांसोबत भांडू (Uttar Pradesh Crime) लागला. त्याच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कुऱ्हाडीने वार करत वडिलांचा खून केला. ही घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

 मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना
Man kills daughter : पुन्हा सैराटचा थरार! आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवलं

पोलीस शोधात व्यस्त

शेजाऱ्यांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच अतिरिक्त एसपी कालू सिंह लव लष्करासह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या पथकाने घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा (crime news) केला. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. आता पोलीस आरोपीला या घटनेसाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

 मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना
Terrorist Killed : भारतीय जवानांनी २४ तासांतच घेतला बदला; बारामुल्लामध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com