Terrorist Killed : भारतीय जवानांनी २४ तासांतच घेतला बदला; बारामुल्लामध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा VIDEO

Jammu Kashmir Encounter : भारतीय लष्कराने २४ तासांच्या आतच हल्ल्याचा बदला घेतला. बारामुल्ला येथे शोधमोहिम राबवून ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
Jammu Kashmir Encounter
Jammu Kashmir EncounterSaam TV
Published On

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये शुक्रवारी (१३ सप्टेंबर) दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने २४ तासांच्या आतच घेतला. बारामुल्ला येथे शोधमोहिम राबवून ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अजूनही काही दहशतवादी लपून बसले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Jammu Kashmir Encounter
People Drowned During Ganesh Visarjan : गणेश विसर्जनादरम्यान भीषण दुर्घटना; ८ जणांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

बारामुल्लाच्या टापर भागात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. तेथे दोन दहशतवाद्यांना लष्कराने घेरले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.

खंडारा भागात लपून बसलेल्या ३ दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास लष्कराच्या जवानांनी किश्तवाडमध्ये आणखी एक कारवाई सुरू केली. माहितीच्या आधारे लष्कराने किश्तवाडच्या एका भागाला वेढा घातला होता. चारही बाजूंनी वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

या घटनेत भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. अन्य दोन जवानांनाही गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता शनिवारी सकाळी भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला घेतला. बारामुल्लामध्ये माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिसरी कारवाई सुरू केली, ज्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी घातपाताचा डाव

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून सध्या राज्यात आचारसहिंता लागू आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्याचा कट रचला जातोय. मात्र, भारतीय लष्कराचे जवान दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत.

Jammu Kashmir Encounter
Weather Forecast : देशातील १८ राज्यांना आज पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रातील या भागात दिवसभर कोसळणार पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com