

उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली
विवाहितेवर मांत्रिकाकडून बलात्कार
सख्ख्या मावशीने व्हिडीओ तयार करून केलं ब्लॅकमेल
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. आई-वडीलांच्या निधनानंतर अनाथ झालेल्या मुलीचा ज्या मावशीने सांभाळ केला तिच्यावरच तिने आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मावशीने अंधविश्वास आणि भूतबाधा झाल्याच्या नावाखाली तिला मांत्रिकाकडे पाठवले. मावशीच्या सांगण्यावरून त्याने तिच्यावर बलात्कार केला. याचा व्हिडीओ तयार करून ते तिला ब्लॅकमेल करत आहेत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चकेरी परिसरात राहणाऱ्या एका मुलीच्या आई-वडिलांचा मृत्यू होतो. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिची जबाबदारी तिची मावशी घेते. या मुलीने मावशीलाच आई मानले होते. पण त्याच मावशीने तिचा विश्वासघात केल्याचा आरोप तिने केला आहे. तरुणीने आरोप लावला की, मावशीने तिचे लग्न एका तरुणासोबत लावून दिले. त्यानंतर तिने तिला सांगितले की तुझ्यावर जादूटोणा झाला आहे. मावशीने घरी मांत्रिकाला बोलावून घेतलं.
तरुणीने आरोप केला आहे की, भूतबाधा काढताना मांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केला. तेव्हा तिच्या मावशीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. मावशीने या तरुणीला धमकावले की, जर तू पैसे आणले नाही तर हा व्हिडीओ तुझा नवरा आणि सासरच्या लोकांना पाठवेल. भीती आणि बदनामी होईल याच्या भीतीने तरुणीने हळूहळू सासरच्यांकडून पैसे घेऊन मावशीला दिले. ब्लॅकमेलिंग करत मावशीने तिच्याकडून दीड लाख रुपये वसुल केले. असे असताना मावशीची मागणी काही संपली नाही. मावशीने तिला वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी दिली.
मावशीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून पीडित तरुणीने शेवटी आपल्या नवऱ्याला घटनेची माहिती दिली. तिच्या नवऱ्याने तिला साथ देत थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. तरुणीने पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली. पीडितेने आपल्या मावशी आणि मामावर ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. दोघे मिळून तिला वारंवार व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होते. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरूवातीच्या तपासातून मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकरण समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.