

हरिद्वारच्या रुरकीमध्ये धक्कादायक दुहेरी हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे.
आरोपी भावाने अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने दोन बहिणींवर गोळीबार केल्याची माहिती आहे.
मृत बहिणींची नावे संगिता आणि पुष्पा असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. रक्षबंधनाचा सण जवळ आलाय. बहीण भावाला राखी बांधते भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देत असतो. मात्र हरिद्वारमधील रुरकी येथे एका भावाने अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने आपल्या दोन बहिणींची गोळ्या झाडून हत्या केल्याची घनटा घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, हरिद्वारमधील रुरकी येथील गणेशपूर सेक्टरमध्ये हे हत्याकांड घडलंय.
पुष्पा, संगिता असं मृत बहिणींची नावे आहेत. तर विकी असं हत्या करणऱ्या भावाचं नाव आहे. गणेशपूर सेक्टर रोडवर येथे मोठी बहिण संगिता ई-रिक्षाने घरी परत येत होती. त्यावेळी आरोपी भाऊ हा रस्त्यात आधीच दबा धरून बसला होता. ई-रिक्षाचा वेग कमी होताच, विकीने संगीतावर दोन गोळ्या झाडल्या त्यात संगीताचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर विकी तेथून पळून गेला. विकी तेथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आझाद नगर परिसरात गेला तेथे त्याची लहान बहीण पुष्पा राहत होती. विकी तिच्या घरी गेला. तिच्या घराचा दरवाजा ठोठवला. तिने घराचे दार उघडताच तिच्यावर विकीने गोळ्या झाडल्या.
आरोपी विकी हा कोचिंग सेंटर चालवत होता. मालवीय चौक परिसरात त्याचा क्लास होता. दरम्यान विकी पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात देखील गेला होता. नुकताच तो तुरुंगातून सुटून आला होता. दरम्यान या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी मंगळवारी संध्याकाळी एका मित्राच्या अंत्यविधीला गेला होता. रुरकी येथे आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचे वडील आणि इतर दोन नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोठी बहीण संगीता पतीपासून विभक्त झाल्यानंतर माहेरी राहत होती. तर लहान बहिणीनेही दुसरं लग्न केलं होतं. बहिणींच्या वागण्याने आणि वैयक्तिक आयुष्याने विक्की खूप अस्वस्थ झाला होता. त्यांच्या चारित्र्याबद्दल त्याला संशय होता. याच संशयामुळे त्याने दोन्ही बहिणींचा जीव घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.