भाजप नगरसेविकेने शाळेची जमीन लाटली; प्रशासनाकडून चौकशी सुरू, सोलापुरात खळबळ

BJP Corporator Built House on Reserved Land: सोलापुरात भाजप नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महापालिकेच्या शाळेसाठी आरक्षित जागेवर घराचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
BJP corporator alleged construction on municipal school land in Solapur
BJP corporator alleged construction on municipal school land in Solapursaam tv
Published On
Summary
  • भाजप नगरसेविकेने शाळेसाठी आरक्षित जमिनीवर घर बांधल्याचा आरोप

  • सोलापुरात महापालिकेच्या शाळेच्या जमिनीवर घर बांधल्याचा प्रकार

  • श्रीदेवी फुलारे यांच्या घराच्या बांधकामाची महापालिकेकडून चौकशी

राज्यातील शाळा आणि आश्रमशाळामधील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर येत असताना सोलापुरातील एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. सोलापुरातील भाजपच्या नगरसेविकेने शाळेसाठी आरक्षित केलेली जमीनच लाटल्याचा प्रकार उघडकीस आलाय. भाजपच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महापालिकेच्या जागेवर घराचे बांधकाम केल्याचा प्रकार प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात उघडकीस आलाय.

BJP corporator alleged construction on municipal school land in Solapur
Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

विशेष म्हणजे ही जागा महापालिका शाळेसाठी आरक्षित होती, या प्रकारामुळे सोलापूर शहरात खळबळ उडालीय. या प्रकारामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासानाने आता या घराची चौकशी सुरू केली आहे.

श्रीदेवी फुलारे या सोलापूर महापालिकेच्या प्रभाग १५ अ मधील भाजपच्या नगरसेविका आहेत.फुलारे यांनी आपल्या घराचे बांधकाम हे सोलापूर महापालिकेच्या जागेत केल्याचं प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आलंय. आता या घरासाठी बांधकाम परवाना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला. मिळकत कराकडे नोंद कोणत्या पद्धतीची आहे, याची संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.

BJP corporator alleged construction on municipal school land in Solapur
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

विशेष म्हणजे महापालिकेच्या शाळेसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेवर नगरसेविकेनं घराचे बांधकाम केलंय. जागेची प्रत्यक्ष पाहणी, मोजणी व कागदपत्रांची तपासणी करून अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होतं. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिका भूमी व मालमत्ता विभागाने जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीमध्ये प्रथमदर्शनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे घर महापालिकेच्या जागेवर असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या नगरसेविका यांच्या घराला कर आकारणी किती आहे? याची सर्व माहिती घेतली जात आहे. त्यामुळे भूमी व मालमत्ता विभागाने जागेची प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल नगररचना व बांधकाम विभागाकडे पाठवल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिलीय. दरम्यान, याबाबत नगरसेविका श्रीदेवी फुलारे म्हणाल्या की, माझ्या नावावर कोणतीही जमीन नाही, त्यामुळे माझे घर अनधिकृत असण्याचा प्रश्नच येत नाही.

मी लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करत आहे. पण काही लोक राजकीय द्वेषापोटी आरोप केला जातोय. मला अजून कोणतीही नोटीस आलेले नाही. नोटीस आल्यानंतर त्यावर उत्तर देईन. जर एकही पावती निघाली तर आपण नगरसेवकपदाचा राजीमाना देऊन असं फुलारे म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com