Crime: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, आधी अपरहण, झाडाला बांधून बेदम मारहाण; नंतर जिवंत जाळलं

Social Media Influencer Manjeet Kaur killed: सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर तरुणीची पंजाबमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी अपहरण करून तिची क्रूर हत्या केली.
Crime: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, आधी अपरहण, झाडाला बांधून बेदम मारहाण; नंतर जिवंत जाळलं
Social Media Influencer Manjeet Kaur killdSaam Tv
Published On
  • चंदीगडमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीचे हत्या

  • आधी अपहरण केलं नंतर झाडाला बांधून बेदम मारहाण

  • आरोपींनी तरुणीला जिवंत जाळलं

  • जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. मनजीत कौर (२८ वर्षे) असं या इन्फ्लुएन्सरचे नाव असून लिव्ह इन पार्टनरने तिची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. आरोपीने मनजीतचे अपहरण करून तिला एका झाडाला बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर ज्ललनशील पदार्थ टाकून तिला पेटवून देण्यात आले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनजीतवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान २६ ऑगस्टला तिचा मृत्यू झाला. मनजीत जवळपास महिनाभर मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या हत्येमुळे पंजाब हादरले आहे.

२८ वर्षीय मनजीतचे आरोपीने चंदीगडमधून अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी तिला मोरिंदा येथे नेऊन एका झाडाला बांधून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला पेटवून दिले. या घटनेत ती गंभीररित्या भाजली होती. सुमारे ५४ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. तिची आई कांता देवी यांच्या तक्रारीच्या आधारे चंदीगड पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Crime: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, आधी अपरहण, झाडाला बांधून बेदम मारहाण; नंतर जिवंत जाळलं
Crime: बायकोकडून नवऱ्याची हत्या, चाकूने पोट फाडलं, आतड्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरल्या, नंतर...

मनजीतच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलैच्या रात्री उशिरा शुभी आणि पिंडा यांनी मनजीतला चंदीगडच्या सेक्टर ३४ मधील एका दारूच्या दुकानाजवळ भेटायला बोलावले होते. ते मनजीतला आधीपासून ओळखत होते. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मनजीतला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मोरिंदा येथे नेले. जिथे तिलाला जंगलातील एका झाडाला बांधून जाळून टाकण्यात आले. याघटनेनंतर एक ओळखीचा व्यक्ती घटनास्थळी पोहोचला त्याने ब्लँकेटने आग विझवली आणि तिला तातडीने मोरिंदा येथील रुग्णालयात दाखल केले.

Crime: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, आधी अपरहण, झाडाला बांधून बेदम मारहाण; नंतर जिवंत जाळलं
Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

प्रकृती गंभीर असल्यामुळे मनजीतला पुढील उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यानंतर ९ जुलै रोजी पीजीआय चंदीगड येथे पाठवण्यात आले. मनजीत अनेक आठवडे बेशुद्ध होती. ५ ऑगस्ट रोजी शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. मात्र उपचार करूनही तिची प्रकृती खालावत गेली आणि २६ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. मनजीतच्या मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मनजीतच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Crime: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, आधी अपरहण, झाडाला बांधून बेदम मारहाण; नंतर जिवंत जाळलं
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १४०(१) (अपहरण), १०३(१) (खून) आणि ३(५) (सामायिक गुन्हेगारी जबाबदारी) अंतर्गत एफआयआर नोंदवला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज देखील तपासत आहेत. दरम्यान, मनजीत मोहाली, सेक्टर १२३, सनी एन्क्लेव्ह येथे राहत होती. तिचा घटस्फोट झाला होता आणि तिला ७ वर्षांचा एक मुलगा होता. इन्स्टाग्रामवर तिचे अंदाजे १,४६,००० फॉलोअर्स होते. ती पंजाबी-हरियाणवी गाण्यांवर आधारित रील्स आणि सौंदर्यप्रसाधनांशी रिल्स तयार करत होती. यूट्यूबवरही तिचे ४,००० सबस्क्राइबर्स होते. सोशल मीडियावर ती खूपच प्रसिद्ध होती.

Crime: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या, आधी अपरहण, झाडाला बांधून बेदम मारहाण; नंतर जिवंत जाळलं
Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com