मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, ६ गंभीर, ३६ चिमुकल्यांना वाचवले

Amravati Hospital Fire death : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU मध्ये पहाटे भीषण आग लागून तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढले.
Amravati Hospital Fire death
Amravati Hospital Fire deathSaam TV marathi
Published On

Amravati district women hospital NICU fire latest news : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातून (डफरिन रुग्णालय) एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पहाटे ३:३० वाजता घडली दुर्घटना

साम टीव्हीच्या स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षात पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणातच संपूर्ण कक्षात धुराचे लोट पसरले आणि आग भडकली. त्यावेळी या विभागात ३९ नवजात बालकांवर उपचार सुरू होते.

Amravati Hospital Fire death
ST Bus Accident : कन्नड घाटात थरार! एसटी बसचा स्टेअरिंग रॉड जॅम झाला अन्...; ५९ प्रवाशांचा जीव वाचला

कर्मचाऱ्यांची प्रसंगावधानता, ३६ बालकांचे प्राण वाचले

आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका (नर्सेस) आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी धुराच्या आणि आगीच्या लोटातून ३६ नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी गंभीर स्थिती असलेल्या ६ बालकांना तातडीने पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Amravati Hospital Fire death
NEET, TET नंतर महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला, बहिणीसाठी शिक्षिकेनेच रचला कट

तीन बाळांचा दुर्दैवी अंत

कर्मचाऱ्यांनी प्राणांची बाजी लावून बालकांना बाहेर काढले, तरीही आगीच्या तीव्रतेमुळे ३ चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत बालकांच्या नातेवाइकांनी तीव्र आक्रोश केला असून संपूर्ण अमरावती शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमागचे निश्चित कारण आणि रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com