Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

Case Register Against Minister Bodyguard: नागपूरमध्ये राज्यमंत्र्याच्या अंगरक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने त्याच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले
Nagpur CrimeSaam Tv
Published On
  • नागपूरमध्ये राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाविरोधात गुन्हा

  • एका महिलेने त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला

  • लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण केले

  • महिलेचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

पराग ढोबळे, नागपूर

नागपुरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाने एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर अंगरक्षकाविरोधात रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा महिलेने आरोप केला आहे. या अंगरक्षकावर त्याच्या बायकोने देखील गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय सदाशिव सलामे असं गुन्हा दाखल झालेल्या अंगरक्षकाचे नाव आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा तो अंगरक्षक आहे. अजय सलामे याच्याविरुद्ध रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सलामेने एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केलं. तसंच फोटो आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची त्याने महिलेला धमकी दिली.

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले
Crime News : बाप की हैवान! ३२ वर्षीय दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, बाभूळगावात खळबळ

पीडित महिलेने रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सलामेविरोधात गुन्हा दाखल केला.सलामे याच्याविरुद्ध BNS कलम ६९, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने स्वतःच्या आणि मुलांच्या जीविताला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेप्रकरणी पीडित महिलेने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि एसडीपीओ रमेश बरकते यांची भेट घेतली.

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

या प्रकरणात सलामेसह एका महिलेविरुद्धही गुन्हा दाखल आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. महिलेच्या तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यावले आणि राजकुमार थोरात यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अजय सलामे यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचा अंगरक्षक होता. सलामेकडे शासकीय अग्निशस्त्र असल्याने त्याचा धाक दाखवत असल्याचा आरोप त्याच्या बायकोने केला आहे.

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले
Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com